Shivshakti-Bhimshakti : युतीची घोषणा! "रस्त्यावर लढणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत वाट्याची हमी"; आनंदराज आंबेडकरांकडून एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक

Shivashakti-Bhimshakti Alliance: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणाची मुहुर्तमेढ रोवली गेली आहे.
Shivshakti-Bhimshakti : युतीची घोषणा! "रस्त्यावर लढणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत वाट्याची हमी"; आनंदराज आंबेडकरांकडून एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक
Published on
Updated on

Shivashakti-Bhimshakti Alliance: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणाची मुहुर्तमेढ रोवली गेली आहे. आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाचा उल्लेख करत त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं. तसंच रस्त्यावर लढणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा मिळण्याची हमी भेटल्यानं आपण ही युती केली असल्याचं आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितलं.

Shivshakti-Bhimshakti : युतीची घोषणा! "रस्त्यावर लढणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत वाट्याची हमी"; आनंदराज आंबेडकरांकडून एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक
Prakash Mahajan: अमित ठाकरे घेणार प्रकाश महाजनांची भेट! मनसेत राहणार की जाणार? महाजनांच्या मनात नेमकं काय सुरुए?

एकनाथ शिंदेंचं तोंडभरुन कौतुक

यावेळी आनंदराज आंबेडकर म्हणाले, "महाराष्ट्रात शिवशक्ती-भिमशक्ती ही युती आजची नाही तर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरुवात झालेली युती आहे. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी म्हणून आम्ही दोन्ही कार्यकर्ते एकत्र आलो आहोत. मी एकनाथ शिंदे यांचं मुद्दाम कार्यकर्ता म्हणून उल्लेख करतो आहे कारण मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ते मुख्यमंत्री म्हणून वागले नाहीत तर जनतेच्या सुखदुःखाशी एकरुप होण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशा या कार्यकर्त्यासोबत देशातील आणि महाराष्ट्रातील प्रचंड मोठा आंबेडकरी समाज हा आजपर्यंत अनेक वर्षे रस्त्यावरील लढाई लढत आला. पण त्याला काही मिळालं नाही.

सध्या होणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्याला देखील सत्तेचा लाभ मिळावा यासाठी म्हणून आम्ही दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलं. आज मला आनंद वाटतो की एवढ्या मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आलेत, मला पूर्ण खात्री आहे की यामुळं महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय जीवन ढवळून निघाल्याशिवाय राहणार नाही"

Shivshakti-Bhimshakti : युतीची घोषणा! "रस्त्यावर लढणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत वाट्याची हमी"; आनंदराज आंबेडकरांकडून एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक
Mahadev Munde Case : महादेव मुंडेंचे खूनी अजूनही मोकाट, कुटुंबियांचा सयंम संपला; आत्मदहनाचा प्रयत्न, विषही प्राशन केले!

युती का घडली?

काहीजण म्हणतील की त्यांचे विचार आणि आमचे विचार वेगळे आहेत. पण मी हे सुरुवातीलाच सांगतो की या देशातील प्रत्येक माणूस हा बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेप्रमाणं चालतो त्यामुळं त्यांच्या विचारात आणि आमच्या विचारात काही वेगळेपणा असण्याचा प्रश्नच नाही. त्याही पलिकडं जाऊन सांगतो की, मुख्यमंत्रीपदाच्या काळात एकनाथ शिंदे यांनी बौद्ध धर्मात महत्वाचा असलेल्या वर्षावासाच्या काळात खास ५० भन्तेजींना बोलवून त्यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भोजनदान केलं.

महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे. तेव्हापासून यांच्यासोबत गेलं तर महाराष्ट्रात चमत्कार घडेल असं आम्हाला वाटलं. दीनदुबळ्या शेतकऱ्यांना न्याय, तसंच लाडकी बहीण सारखे अनेक चांगले उपक्रम त्यांनी आणले. त्यामुळं कुठल्याही अटी न टाकता आम्ही त्यांच्यासोबत जायचं ठरवलं आहे. फक्त सांगितलं आहे की आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घ्या आणि तो शब्द दिलेला आहे. त्यामुळेच ही युती घडते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com