Devendra Fadnavis: फडणवीसांनी सभागृहातच उद्धव ठाकरेंना दिली थेट ऑफर! म्हणाले, इकडे यायचं...

Devendra Fadnavis: राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून प्रचंड अस्वस्थता असल्याचं चित्र आहे. निवडणुका आल्या की कोणाची युती होईल, अन् कोणाचा पक्ष फुटेल? काही सांगता येत नाही.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
Published on
Updated on

Devendra Fadnavis: राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून प्रचंड अस्वस्थता असल्याचं चित्र आहे. निवडणुका आल्या की कोणाची युती होईल, अन् कोणाचा पक्ष फुटेल? काही सांगता येत नाही. नुकतीच आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांची युती झाली आहे. त्यातच आजच विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट ऑफर दिली. त्यांनी नेमकं का आणि काय म्हटलं? पाहुयात.

Devendra Fadnavis
Shivshakti-Bhimshakti : युतीची घोषणा! "रस्त्यावर लढणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत वाट्याची हमी"; आनंदराज आंबेडकरांकडून एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांची टर्म संपल्यानं आज त्यांचा निरोप समारंभ सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची भाषण झाली. यावेळी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील सभागृहात उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री बोलण्यासाठी उभा राहिले आणि म्हणाले, अंबादास दानवे यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. पण काही कारणानं ते त्या निवडणुकीत पोहोचू शकले नाहीत. त्यावेळी आम्ही समोरासमोर लढलो होतो.

पण २०१९ला सोबत लढलो होतो. दानवेंचा आज निरोप समारंभ होतो आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं. आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही. मी असं बोलल्यावर उद्धव ठाकरे म्हणतील मी पळवापळवी करतो म्हणून. आता २०२९पर्यंत आम्हाला विरोधीबाकांवर येण्याचा काही स्कोप उरलेला नाही. पण तुम्हाला इकडे यायचा स्कोप...विचार करता येईल. त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीनं करु, पण आम्हाला तिकडे नेण्याचा स्कोप याठिकाणी काही उरलेला नाही.

Devendra Fadnavis
Prakash Mahajan: अमित ठाकरे घेणार प्रकाश महाजनांची भेट! मनसेत राहणार की जाणार? महाजनांच्या मनात नेमकं काय सुरुए?

दरम्यान, विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे अचानक समोर समोर आल्यानं त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन करत चर्चाही केली. त्यानंतर सभागृहात फडणवीसांनी थेट ठाकरेंना सत्ताधारी बाजूला येण्याची ऑफरच दिल्यानं याची चांगलीच चर्चा सुरु होती. फडणवीसांच्या ऑफरनंतर सभागृहात हास्यकल्लोळ झाला मात्र राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती बघता कधी काय होईल सांगता येत नाही, असा सूरही सर्वसामान्यांचा असल्यानं या घटनेची वेगळीच चर्चा सुरु होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com