Murlidhar Mohol Narendra modi  sarkarnama
पुणे

Modi birthday Pune highlights : पुण्याच्या अवकाशात मोदींच्या वाढदिवसानिमित्त हजारो ड्रोनचा थरार! खासदार मोहोळांनी घेतलाय पुढाकार!

MP Mohol Modi birthday event News : अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात हा ड्रोन शो प्रथमच होणार असून यातून विकसित भारताच्या संकल्पाचे दर्शन पुणेकरांना घडणार आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस 17 सप्टेंबरला देशभरात विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पुण्यात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असा ड्रोन शो स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.

‘ज्योतीने तेजाची आरती’ या ड्रोन शोद्वारे पुणेकरांच्या वतीने पंतप्रधान मोदींना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात हा ड्रोन शो प्रथमच होणार असून यातून विकसित भारताच्या संकल्पाचे दर्शन पुणेकरांना घडणार आहे.

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या वतीने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून थ्रीडी स्वरूपात असलेला हा ड्रोन शो 45 मिनिटे असेल. त्यात मोदी सरकारच्या कामगिरीसह पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मानबिंदूंचे दर्शनही पुणेकरांना घडणार आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी केलेल्या विकसित भारताचा संकल्पही याद्वारे पुणेकरांना अनुभवता येईल. हजारो ड्रोन्स जेव्हा अवकाशात झेपावतील, तेव्हा पुण्याच्या 3-4 किलोमीटर परिसरापर्यंतच्या भागातील नागरिकांना हा शो अवकाशात पाहता येणार आहे.

मोदीजींच्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला हजारो ड्रोन पुण्याच्या अवकाशात झेपावतील आणि त्यांच्या विविध फॉर्मेशन्समधून विकसित भारताच्या दिशेने झालेल्या प्रवासाचे नयनरम्य दर्शन पुणेकरांना घडणार आहे. मोहोळ म्हणाले, ‘16 सप्टेंबर या दिवशी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. दुपारी 2 ते 6 वाजेपर्यंत दिव्यांगांसाठी सहाय्यता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात 1200 हून अधिक दिव्यांगांना 1750 आवश्यक साहित्यांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. शिबिरानंतर याच ठिकाणी सायंकाळी 5 ते 10 ख्यातनाम संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांची लाईव्ह कॉन्सर्ट होईल. दरम्यान रात्री 8 वाजता ‘ज्योतीने तेजाची आरती’ हा ऐतिहासिक ड्रोन शो होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT