pune car accident.jpg Sarkarnama
पुणे

Pune Crime News: पुण्यातील सदाशिव पेठेत मोठी दुर्घटना; मद्यधुंद कारचालकानं 13 जणांना उडवलं

Pune Crime News : पुण्यात एका मद्यधुंद कार चालकानं गाडी चालवता येत नसतानाही ड्रायव्हिंग करत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना उडवलं. हे सर्व विद्यार्थी चहाच्या स्टॉलवर उभे होते. याचवेळी या भरधाव वेगातील कारनं विद्यार्थ्यांना उडवल्याची माहिती समोर येत आहे.

Deepak Kulkarni

Pune News : पुण्यातील सदाशिव पेठेतून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे.शहरातील नेहमीच गजबजलेल्या सदाशिव पेठेत एका भरधाव कारनं एमपीएससीच्या च्या 13 विद्यार्थ्यांना उडवल्याचं धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी(ता.31) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या जखमी विद्यार्थ्यांवर ससून, संचेती, मोडत रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्यात (Pune Car Accident) एका मद्यधुंद कार चालकानं गाडी चालवता येत नसतानाही ड्रायव्हिंग करत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना उडवलं. हे सर्व विद्यार्थी चहाच्या स्टॉलवर उभे होते. याचवेळी या भरधाव वेगातील कारनं विद्यार्थ्यांना उडवल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना सदाशिव पेठेतील भावे हायस्कूल परिसरात घडली.

पुणे पोलिसांनी या घटनेतील कारचालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच ही अपघातग्रस्त (Accident) कारही जप्त करण्यात आली आहे. मद्यपी भरधाव कार चालकाने 13 जणांना उडवले. त्यानंतर कार चालकाने त्या विद्यार्थ्यांना फरफटत नेल्याची घटना शनिवारी (ता. 31) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींमध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा समावेश असून,तिघेजण गंभीर जखमी आहेत. कारचालक जयराम शिवाजी मुळे (वय 27, रा. बिबवेवाडी, मूळ रा. मुळज ता. उमरगा, जिल्हा धाराशिव) याला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचा जोडीदार राहुल गोसावी यालाही ताब्यात घेतलं आहे.

एकीकडे सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणेनं केलेल्या आत्महत्येनं संपूर्ण पुणे शहर हादरलं असतानाच आता ही धक्कादायक घटना समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेवरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

या अपघातातील कारचालक जयराम मुळे हा सदाशिव पेठेतील एका मेडिकल दुकानात कामास आहे. त्याचा काल वाढदिवस होता. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याने मित्राची गाडी घेतली. त्याच्याजवळ वाहन परवाना नसून, त्याला गाडी चालवता येत नाही. तरीही त्याने मित्राची गाडी घेतली. ज्याची गाडी आहे, तो गाडीबाहेरच थांबला होता. त्याने दुसऱ्या एका मित्राला गाडीत सोबत घेतले. त्याने गाडी सुरू केली आणि दुसऱ्या चौकातच टपरीजवळ चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांना उडवले. या अपघातात तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना संचेती रुग्णालयात तर इतर दहा जखमींना मोडक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आता पोलिसांनी जयराम मुळे याला ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत कारचालकाने मद्यसेवन केल्याचे निर्दशनास आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी दिली. पुढील तपास विश्रामबाग पोलिस करीत आहेत.

गेल्या वर्षी मे महिन्यात कल्याणीनगर भागात पोर्श कारने दुचाकीला धडक दिली होती.या अपघातामध्ये दुचाकी वरून जात असलेल्या दोन अभियंत्यांच्या जागीच मृत्यू झाला होता.यामध्ये एका तरुण तरुणीचा समावेश होता. ज्या कारने हा अपघात झाला ती कार एक 17 वर्षाचा अल्पवयीन मुलगा चालवित होता. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा हा मुलगा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT