Pune News : राज्यात या वर्षाअखेरीस मुदत संपत असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तपाण्यास सुरुवात झाली आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था व विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने जोरदार कामगिरी केली आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात ही जागा कोणाला सुटणार यावरून उमेदवार ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी आतापासूनच भाजप, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या सहा वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड विजयी झाले होते. मात्र, त्यांनी त्यानंतर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमध्ये शरद पवार यांच्यासोबत ते राहिले आहेत. मात्र, त्यानंतरच्या काळात भाजपशी जवळीक साधत उमेदवारी देण्याच्या अटीवर त्यांचे चिरंजीव शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शरद लाड गेल्या काही दिवसापासून पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी करीत आहेत.
त्यातच आता लवकरच पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारीवरून महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीत संघर्ष पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार प्रताप माने यांनी आमदार शरद लाड यांच्यावर निशाणा साधला. पदवीधर मतदारसंघातून निवडून आले. मात्र पदवीधरांच्या प्रश्नावर विधान परिषद आणि विधानसभेत आमदार अरुण लाड यांनी कधीच आवाज उठवला नाही, असा आरोप पुणे पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षाचे इच्छुक उमेदवार प्रताप माने यांनी केला आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली आहे. मात्र, या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार यावरून जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे महायुतीत राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये संघर्ष वाढणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
आमदार अरुण लाड यांच्या कामगिरी पदवीधरांना चांगलीच माहित आहे. त्यामुळे त्यांना येणाऱ्या निवडणुकीत पदवीधर उत्तर देतील,असे देखील माने यांनी स्पष्ट केले आहे. सांगलीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणी संदर्भात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या पार पडलेल्या आढावा बैठकीत माने बोलत होते.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आम्ही अश्वमेध सोडला आहे आणि पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा पदरात पाडून घेऊ,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. तसेच पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी त्यांच्या मुलाची उमेदवारी थांबवून, प्रताप माने यांना दिलेले शब्दाप्रमाणे पाठिंबा द्यावा,असे आवाहन देखील यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.