Kolhapur News, 10 Aug : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेते आणि इच्छुकांनी कंबर कसली आहे. अशातच पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघावर भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. अशातच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे दोन्ही मतदारसंघ भाजपचाच असल्याचा दावा केला आहे.
तर दुसरीकडे काही महिन्यापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधरसाठी सांगलीतील उमेदवारांची घोषणा केली. पण दुसरीकडे कोल्हापुरातील एका पदाधिकाऱ्यांनी थेट चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावूनच उमेदवारीची मागणी केली आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी सांगलीतील राष्ट्रवादीचे नेते आणि पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनी उमेदवारीचा शब्द घेऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे.
अशातच त्यांच्या प्रवेशा दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद लाड यांना पुणे पदवीधरच्या उमेदवारीबाबत भाष्य केले होते. असे असताना कोल्हापुरातून मात्र पुणे पदवीधरसाठी आणखी एक चेहरा समोर आला आहे. थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांचे फलक लावत माणिकराव पाटील चुयेकर यांनी उमेदवारीची मागणी केली आहे.
यापूर्वी पुणे पदवीधरसाठी भाजपमध्येच आता आणखीन उमेदवार इच्छुक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीतील घटक पक्ष देखील उमेदवारीवरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. भाजपकडून माणिक पाटील, शरद लाड, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भैया माने हे देखील इच्छुक आहेत. तर शिक्षक मतदारसंघावर देखील भाजपने दावा केला असून भाजपकडून स्वामी विवेकानंद संस्थेचे कौस्तुभ गावडे, तर शिवसेनेकडून मंगेश चिवटे हे इच्छुक आहेत.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ भाजपचाच
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाबाबत महायुतीमधील शिवसेना एका उमेदवाराच्या नावाची घोषणा करून मोकळी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करीत आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघातील अपक्ष आमदार हा शिवसेनेने घेतला आहे. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक हे दोन्ही मतदारसंघ वर्षानुवर्षे भाजपकडे आहेत, असा दावा आज इचलकरंजी दौऱ्यावर असताना केला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीचा आढावा घेताना चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.