

Nagpur News : राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसापासून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडीला लागलेली गळती अद्याप सुरूच असल्याचे दिसत आहे. महायुतीमध्ये गेल्या काही दिवसापासून जोरदार इनकमिंग होत आहे. विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्याने साथ सोडत 600 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.
नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रिसोड तालुक्यातील काँग्रेसच्या बडया नेत्यासह सुमारे 600 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा नागपूर येथे पार पडला. रिसोड येथील युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सचिन इप्पर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या सोबत रिसोड तालुक्यातील अनेक सरपंच, माजी सरपंच, सोसायटीचे अध्यक्ष, सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी कमळ हाती घेतले आहे.
काँग्रेस नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणचे समीकरण आता बदलणार आहे. या पक्षप्रवेशामुळे वाशिम जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला. पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे .
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत करत भाजप संघटन अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. त्यासोबतच भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश केल्याची प्रतिक्रिया प्रसार माध्यमाना बोलताना दिली.
पुण्यात उद्धव ठाकरेंच्या सेनेला धक्का
शिवाजीनगर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख राहिलेले आणि नुकतीच पुणे महानगरपालिका काँग्रेस पक्षाकडून लढवलेले प्रवीण डोंगरे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात तसेच रस्त्यावरच्या लढाईमध्ये तसेच अनेक आंदोलनात ते शिवसेनेकडून सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. राज्यातील नेतृत्व मुरलीधर मोहोळ आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विकासाभिमुख कामांमुळे प्रेरित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असे प्रवीण डोंगरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.