Pune Accident Case Sarakarnama
पुणे

Pune Accident Case : विशाल अगरवालसह आरोपीचे आजोबा अन् कार चालकाची पोलिसांकडून कसून चौकशी !

Pune Hit and Run Case : अगरवाल कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांकडून माध्यमप्रतिनिधींना धक्काबुक्की झाल्याने पोलीस आयुक्तालय परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.

सरकारनामा ब्यूरो

Pune Car accident News : पुणे अपघात प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. शिवाय, आज एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये कथितरित्या आरोपी मुलगा पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचे आणि बरचं काही आक्षेपार्ह बोलत असल्याचे दिसून आले आहे. मात्र हा व्हिडीओ अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अगरवाल याचाच आहे हे अद्याप सिद्ध झालेलं नाही. तर हा व्हिडीओ माझ्या मुलाचा नाही असा दावा आरोपी वेदांतच्या आईने केल्याचंही समोर आलं आहे.

दरम्यान, विशाल अगरवालच्या निकटवर्तीयाकडून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना अरेरावी भाषा आणि धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे काही वेळ पोलिस आयुक्त कार्यालयातील वातावरण गंभीर बनले होते. तसेच पोलिसांनी जप्त केलेल्या अपघातग्रस्त पोर्शे मोटारीची ‘फॉरेन्सिक’च्या पथकाकडून तपासणी करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला कार चालविण्यासाठी आणि मद्य पार्टीला परवानगी दिल्याप्रकरणी आरोपी मुलाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांना पोलिसांनी अटक करून, त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पळून जाण्याचे कारण काय, अशी विचारणा केली. तसेच, पोलिसांनी गुरुवारी विशाल यांचे वडील सुरेंद्रकुमार अगरवाल, मोटारचालक आणि अपघाताच्या वेळी अल्पवयीन आरोपीच्या समवेत असलेल्या मित्राचीही चौकशी केली आहे.

याशिवाय विशाल अगरवाल(Vishal Agrwal) यांचे वडील सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनीही पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिली होती. त्यामुळे त्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. एवढच नाहीतर अगरवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही समोर येत आहे.

वेदांत अगरवाल विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे आणि त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे. तर, पोलिस कोठडीत असलेल्या विशाल अगरवाल, ब्लॅक पबचा कर्मचारी नीतेश धनेश शेवानी आणि जयेश सतीश गावकर यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असून, या तिघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलिसांनी अल्पवयीन मुलाचा आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल आणि विशाल अग्रवाल या पिता-पुत्राला समोरासमोर बसवून चौकशी केली. नातवाला जामीन मिळावा, यासाठी सुरेंद्रकुमार यांनी न्यायालयात हमी दिली होती. याबाबत त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. तर, मुलाने गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी चालवायला दे. तू त्याच्या बाजूला बस, अशी सूचना विशाल अग्रवाल यांनी दिली असल्याचे चालक गंगाराम डोळसने त्याच्या जबाबात सांगितले होते. याबाबत पोलिसांनी(Pune Police) चालकाची चौकशी केली. परंतु तो मोटारीत होता की नाही, याबाबत पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT