Pune Hit And Run Case: कल्याणीनगर प्रकरणात राजकीय हस्तक्षेप, वंचितनं साधलं 'टायमिंग'; थेट आमदारावरच गुन्हा...

Vanchit Bahujan Aaghadi News : पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांची भूमिका संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी पोलिस ठाण्यात जाऊन हस्तक्षेप केल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
Sunil Tingre, Vishal Agarwal
Sunil Tingre, Vishal AgarwalSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणात आरोपीच्या बाजूने संशयास्पद भूमिका घेतल्याचा आरोप झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा पवार गट) आमदार सुनील टिंगरे यांच्या अडचणी आता वाढू लागल्या आहेत.

दोन तरुण जिवांचा बळी घेतलेल्या या अपघातानंतर आमदार टिंगरे पहाटे तीन वाजता येरवडा पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. त्यांची ही तत्परता अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी होती, असा संशय निर्माण झाला. आरोपीला लागलीच जामीन मंजूर झाल्यामुळे तो आणखी बळावला.

वंचित बहुजन आघाडीने आता आमदार सुनील टिंगरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमदार टिंगरे यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी हस्तक्षेप केला. त्यांच्यावर कलम 353 नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचितने पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष मुनव्वर कुरेशी यांच्या पुढाकाराने हे निवेदन देण्यात आले आहे. आमदार टिंगरे यांच्या भूमिकेवर चौफेर टीका झाली. मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कोणत्याही राजकीय पक्षाने केली नव्हती. ती वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

Sunil Tingre, Vishal Agarwal
Anna Hajare News : संजय राऊत अन् आव्हाडांनंतर आता महाविकास आघाडीचा 'हा' नेताही अण्णा हजारेंवर भडकला!

पुण्याच्या दुर्घटनेत एक तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाला. अल्पवयीन चालवत असलेल्या पोर्शे कारणे त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत दुचाकीवरील तरुणी उंच उडून पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांकडून विशेष वागणूक देण्यात आली. आमदार सुनील टिंगरे यांनी पहाटे तीन वाजता येरवडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यावरून गदारोळ माजला.

पोलिसांवर आणि आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांच्यावर टीका सुरू झाली. प्रकरण गंभीर होत असल्याची चाहूल लागल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुणे पोलिस आयुक्तालय गाठावे लागले होते. त्यानंतर पोलिसांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल केले होते. अल्वयीन आरोपच्या वडिलांनाही बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रस्थापित राजकीय नेते आणि पोलिसांची मिलीभगत असते. आपली कामे करून घेण्यासाठी हे दोन्ही घटक एकमेकांना घाबरत नाहीत. 'वंचित'सारखे (Vanchit Bahujan Aaghadi) लोकांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे पक्ष मात्र अशा प्रकारांना भीक घालत नाहीत. उपेक्षितांसाठी अशा पक्षांचा लढा सुरू असतो. तो निवडणुकीतील यश-अपयशावर अवलंबून राहत नाही. राज्यात सामाजिक चळवळी काही प्रमाणात थंडावल्याचे दिसत आहे.

Summary

अशा चळवळींद्वारे अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचे काम केले जायचे. त्यांच्या जोडीला एनजीओ पण असायच्या, मात्र गेल्या दहा वर्षांत एनजीओंची अवस्था चळवळींसारखी झाली आहे. अशा परिस्थिती वंचित बहुजन आघाडी, डावे पक्ष, रिपब्लिकन पक्ष अशा सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवत असल्याचे दिसत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Sunil Tingre, Vishal Agarwal
Chandrakant Khaire : '...तर तुळजाभवानी मातेची खणा-नारळाने ओटी भरून जागरण गोंधळ घालेन!'; चंद्रकांत खैरेंचा नवस

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com