Pune News : पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणी रोज धक्कादायक गोष्टी पोलिस तपासात समोर येत आहे. या प्रकरणात ससूनमध्ये अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती.ससूनमधील डॉक्टरांनी तीन लाख रूपये घेऊन या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.यानंतर ससूनमधील दोन डॉक्टर आणि एका शिपायाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे.
या प्रकरणात आता आणखी एक मोठी अपडेट समोर येत असून ससूनचे डीन विनायक काळे (Vinayak Kale) यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या ठिकाणचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. .
पुण्यातील हिट अॅण्ड रन प्रकरणात ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या सॅम्पलमध्ये फेरफार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला असून या अहवालाच्या आधारे आता कारवाई करण्यात आली आहे.
त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाकडून देखील या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यासाठी त्रिसदस्य समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांनी मंगळवारी ससून मध्ये जाऊन चौकशी केली.कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या सॅम्पलमध्ये फेरफार केल्याचे समोर आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला असून या अहवालाच्या आधारे आता कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणांमध्ये ससून रुग्णालयात काम करणारे डॉ. अजय तावरे(Ajay Tawre) तसेच अपघातग्रस्त वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर आणि अतुल घाटकांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांनी बुधवारी (ता.29) पत्रकार परिषद घेतली होती . ससून चौकशी समितीने काल केलेल्या चौकशी संदर्भात माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे. ससून रुग्णालयातील आतापर्यंत 3 कर्मचाऱ्यांना करण्यात अटक आली आहे. शिवाय ससून रुग्णालय प्रशासनावर लावण्यात आलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं. यावेळी डॉ. विनायक काळे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.
डॉ. अजय तावरे यांच्याकडून न्याय वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख चार्ज काढून घेतला आहे. डॉ. विजय जाधव यांच्याकडे चार्ज दिला आहे. अतुल घटकांबळे हा शिपाई आहे. त्याला निलंबित केलं आहे. श्रीहरी हळनोर हे तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असल्याने 28 तारखेला सेवा समाप्त करण्यात आली आहे, असं विनायक काळे म्हणाले.
डॉ. अजय तावरे यांच्याकडे असणार कार्यभार आम्ही काढून घेतला आहे. तर डॉ श्रीहरी हळनोर यांना बडतर्फ केलं आहे. ससून रुग्णालयासाठी ही बाब अत्यंत वाईट आहे. अशा पद्धतीने फेरफार करणं चुकीचं आहे. यासंदर्भात पोलिसांनी जी माहिती मागितली आहे ती त्यांना देण्यात आली आहे. माझ्याकडूनही विभागीय आयुक्त आणि आमच्या वरिष्ठांनी माहिती मागितली आहे. कालच्या चौकशी समितीसोबत मी नव्हतो. ससूनमधील (Sasoon) एकूण 3 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, असंही विनायक काळे यांनी सांगितलं
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.