Pune Accident Porsche : डॉ. तावरे मला दारु आणायला सांगत होते, ससूनमधील वॉर्डबॉयने वाचला तक्रारींचा पाढा !

Pune Hit And Run Case : ससूनमधील डॉक्टरांनी तीन लाख रूपये घेऊन या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याने राज्याच्या आरोग्य विभागाकडून देखील या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यासाठी त्रिसदस्य समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांनी मंगळवारी ससून मध्ये जाऊन चौकशी केली.
Pune Hit And Run Case Dr. Taware
Pune Hit And Run Case Dr. TawareSarkarnama
Published on
Updated on

Pune Porsche Crash News : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या 'हिट अ‍ॅण्ड रन' केस मध्ये नवीन माहिती दररोज समोर येत आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी पोलिस, बाल न्याय मंडळापासून ते ससून रुग्णालय अशा विविध ठिकाणी 'हितसंबध' जोपासले गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यादृष्टिने आता या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.

कल्याणीनगर भागात भरधाव वेगाने पोर्श कारने दिलेल्या धडकेमध्ये दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या गाडीने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, गाडीवरुन जाणारे तरुण तरुणी जागेवरच मृत्यूमुखी पडले. त्यानंतर रस्त्यावरील नागरिकांनी ही कार चालविणाऱ्या अल्पवयीन मुलाला गाडीतून बाहेर काढून चांगलाच चोप दिला होता. हा अल्पवयीन मुलगा शहरातील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असल्याने त्याचा त्रास कमी करून त्याला या प्रकरणातून वाचविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Hit And Run Case Dr. Taware
Porsche Crash Case: तीनशे शब्दांचा निबंध भोवला; दोन डॉक्टरांच्या निलंबनानंतर तपासाची चक्रे आता बाल न्याय मंडळाकडे

पोलिस (Police) स्टेशनमध्ये या मुलाला खाण्यासाठी पिझ्झा, बर्गर देण्यात आल्याचा आरोप देखील केला जात होता. या आरोपीला वाचविण्याासाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांचे फोन आले होते. तर काही मंडळी देखील पोलिस स्टेशनमध्ये हजर असल्याचे समोर आले होते. या अल्पवयीन मुलाने हा अपघात केला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात दारू प्यायली होती. त्यामुळे त्याच्या रक्ताच्या तपासणीमध्ये दारू प्यायली असल्याचे सिद्ध झाल्यास तो दोषी आढळू शकतो. हे लक्षात घेत थेट ससून रुग्णालयात तपासणीसाठी दिलेले या अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पल बदलण्यात आले. हा उद्योग करणाऱ्या ससूनमधील दोन डॉक्टर आणि एका शिपायाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

ससूनमधील डॉक्टरांनी तीन लाख रूपये घेऊन या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याने राज्याच्या आरोग्य विभागाकडून देखील या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यासाठी त्रिसदस्य समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांनी मंगळवारी ससून मध्ये जाऊन चौकशी केली. त्यावेळी ससून मधील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. या चौकशी समितीसमोर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेले आरोपी डॉ. अजय तावरे मला दारु आणायला सांगत होते, असा गंभीर आरोप ससूनचे वॉर्डबॉय नितीन सोनवणे यांनी केला आहे.

Pune Hit And Run Case Dr. Taware
Pune Hit And Run Case: नाना पटोलेंचे बोट कुठल्या आमदाराच्या दिशेने?

ड्युटीवर असताना डॉ. तावरे आणि त्याचे मित्र विनाकारण त्रास देत मनमानी कारभार करत होते. त्यांच्या विरोधात अनेकदा राज्य शासनाच्या (State Goverment ) पातळीवर तक्रारी केल्या मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही, असे सांगत सोनवणे यांनी या समितीसमोर तक्रारींचा पाढाच वाचला. मला न्याय द्या नाहीतर मी आत्मदहन करेल, अशा शब्दात सोनवणे यांनी आपले गाऱ्हाणे समितीच्या सदस्यांसमोर मांडले. या सर्व गोष्टींची माहिती समितीने आपल्या अहवालामध्ये नोंदविली असून हा अहवाल आता राज्य सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जाणार आहे.

Pune Hit And Run Case Dr. Taware
Porsche Hit And Run Case Update : पुणे 'कार'नामा.. मोठी अपडेट; रक्तांचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांसह 'ससून'मधील तिघांचे निलंबन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com