Murlidhar Mohol, Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Pune Lok Sabha News: काँग्रेसचं ठरलं! पुण्यातून रवींद्र धंगेकर फायनल, 'या' सात जागांचेही उमेदवार जाहीर

Ravindar Dhangekar candidature : काँग्रेसने महाराष्ट्रात 18 जागा लढवण्याच्या निर्णयावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Chetan Zadpe

Pune News : लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील जवळपास सात नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. पुण्यातून रवींद्र धंगेकर यांचे नाव फायनल झाले आहे. त्यामुळे आता पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत होणार आहे. लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे.

या यादीत पुण्यातून रवींद्र धंगेकर, गडचिरोलीतून नामदेव किरसंड, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, कोल्हापूरमधून शाहू छत्रपती, नंदुरबार गोपाळ पाडवी, नागपूर विकास ठाकरे अशा महाराष्ट्रातील सात नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली आहे. करण्यात आली. (Latest Marathi News)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अजून जाहीर झालेले नाही. जागा वाटपाच्या अंतिम निर्णयाबाबत गुरुवारी मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठकीत होणार आहे. परंतु तत्पूर्वीच काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीत महाराष्ट्रात 18 जागा लढवण्याच्या निर्णयावर निर्णय झाल्याची माहिती काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिली आहे.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख पुणे लोकसभा मतदारसंघाची होती. एक ते दोन अपवाद वगळता काँग्रेसच्याच उमेदवाराने या मतदारसंघातून लोकसभेसाठी प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांनी पुणे लोकसभेसाठी अनेक वर्षे पुण्यातून खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले.

दहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे हे पुणे लोकसभेतून निवडून आले. त्यानंतर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत गिरीश बापट यांना भाजपने उमेदवारी दिली, तर काँग्रेसकडून मोहन जोशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. बापट यांनी मोठ्या मताधिक्याने जोशी यांचा पराभव केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये पुणे लोकसभेची (Pune Loksabha Election) जागा ही काँग्रेसकडे आहे. त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याकडे आता लक्ष लागले आहे.

माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह अन्य काही जणांनी लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र, यामध्ये जोशी आणि धंगेकर यांची नावे आघाडीवर आहेत. आमदार धंगेकर यांनी गेल्या काही दिवसांपासून लोकसभेच्या दृष्टीने आपला प्रचार सुरू केला आहे.

भाजपने लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी जाहीर केल्याने आता काँग्रेसकडून धंगेकर यांचे नाव पुढे येण्याची शक्यता होती. कसबा विधानसभेच्या भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत धंगेकर हे काँग्रेसच्या तिकिटावर कसब्यातून विजयी झाले होते. भाजपचे उमेदवार स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांचा धंगेकर यांनी पराभव केला होता. भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसब्यात धंगेकर यांचा विजय काँग्रेसला प्रोत्साहन देणारा ठरला.

'हक्काचा माणूस ' अशी ओळख आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची असून, त्यांनी गेल्या काही महिन्यांतच लोकांमध्ये जाऊन आपली वेगळी ओळखदेखील निर्माण केली आहे. महागाई, शहरात वाढलेली वाढती गुन्हेगारी, ड्रग्ज अशा विविध प्रश्नांवर धंगेकर यांनी आवाज उठविला आहे. तसेच कसबा भागातील विविध विकासकामे यानिमित्ताने ते नागरिकांशी जोडलेले असतात. त्यामुळे काँग्रेसने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी लढत पाहायला मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT