Pune loksabha  sarkarnama
पुणे

Pune Loksabha News : अबब..! तब्बल 69 ईव्हीएम पडले बंद; प्रशासनाचा भोंगळ कारभार

Sudesh Mitkar

Pune News : पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे लोकसभेच्या जागेसाठी काल मतदान पार पडल. मतदानावेळी बोगस मतदान, मतदार यादीतील घोळ आणि बंद पडलेले ईव्हीएम हे चर्चेचे विषय ठरले. ईव्हीएम विषयी सातत्याने विरोधी पक्षाकडून शंका उपस्थित करण्यात येत असतानाच या तिन्ही मतदारसंघात मिळून तब्बल 69 ईव्हीएम मशीन बंद पडल्याने ईव्हीएम बाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मावळ, शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानादरम्यान वेगवेगळ्या कारणांसाठी प्रशासनाला ईव्हीएम बदलावे लागले. पुणे लोकसभा मतदारसंघात 39 ईव्हीएम तर शिरूर लोकसभा मतदारसंघात 18 ईव्हीएम आणि मावळ लोकसभा मतदारसंघात मतदानावेळी तब्बल 12 ईव्हीएम बंद पडल्याने ते बदलण्याची वेळ प्रशासनावरती आली.

यामुळे नागरिकांवर रांगांमध्ये वाट बघण्याची वेळ आलीच मात्र उमेदवारांमध्ये देखील ईव्हीएम बाबत साशंकता निर्माण झाली. या लोकसभा निवडणुकीदरम्यान ईव्हीएम, कंट्रोल युनिट तसेच व्हीव्हीपॅट यंत्रे बंद बंद पडण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. मावळ, शिरूर आणि पुणे मतदारसंघासाठी सोमवारी प्रत्यक्ष मतदानाला सकाळी सातला सुरुवात झाली.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

मात्र, त्यापूर्वी झालेल्या मॉक पोलमध्येदेखील ईव्हीएम बंद पडल्याचं समोर आलं आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात मॉक पोलदरम्यान 37 ईव्हीएम आणि 14 कंट्रोल युनिट तसेच 17 व्हीव्हीपॅट यंत्र बंद समोर आला आहे. नंतर प्रत्यक्ष मतदान प्रसंगी 30 ईव्हीएम, 10 कंट्रोल युनिट व 19 व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडले असल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता ठिकाणी देखील मतदानावेळी18 ईव्हीएम, 6 कंट्रोल युनिट आणि 18 व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मावळ मध्ये देखील चित्र काही वेगळे नव्हते. मतदानप्रसंगी मावळमध्ये 12 ईव्हीएम, 4 कंट्रोल युनिट आणि 25 व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारमुळे ईव्हीएम मधील बिघाडाचा प्रकार समोर येत असला तरी यामुळे मतदान प्रक्रिया आणि ईव्हीएम बाबत संशय निर्माण होत असल्याचं वारंवार समोर आला आहे.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT