EVM CCTV News : धक्कादायक; ईव्हीएम मशीन ठेवलेल्या बारामतीतील गोदामाचे CCTV बंद, काळंबेरं घडल्याचा संशय!

Baramati CCTV News : शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि सुप्रिया सुळ यांचे इलेक्शन पोलिंग एजंट असलेल्या लक्ष्मीकांत खाबिया यांच्याकडून हा आरोप करण्यात आला आहे.
EVM CCTV News
EVM CCTV NewsSarkarnama

Pune News : राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. अशातच बारामतीतून एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील ईव्हिएम ठेवण्यात आलेल्या गोदामातील सीसीटिव्ही फुटेज बंद पडल्याची धक्कादायक प्रकार समोर आले आहे. मागील एका तासापासून सर्व सीसीटिव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती आहे. शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि सुप्रिया सुळ यांचे इलेक्शन पोलिंग एजंट असलेल्या लक्ष्मीकांत खाबिया यांच्याकडून हा आरोप करण्यात आला आहे. (Lok Sabha

या घडलेल्या प्रकारात काहीतरी काळंबेरं होऊ शकते, अशी चिंता खाबिया यांनी व्यक्त केली. निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रीया पार पडली आहे. मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन स्ट्राँग रुममध्ये जमवण्यात आले. सीसीटिव्ही फुटेजच्या देखरेखीखाली या ईव्हिएन फुटेज ठेवण्यात आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

EVM CCTV News
Code of Conduct Violations News : बारामती लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या तक्रारींचा पाऊस !

यामध्ये कुठलाही अनुचिक घटना आणि गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाचे गोदामावर करडी नजर आहे. मात्र असे असतानाही येथील सीसीटीव्ही एका तासापासून बंद आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. आज सोमवारी साधरण पावणे अकराच्या सुमारास सीसीटीव्ही बंद पडवले आहेत. मी संबंधित विभागाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला प्रतिसाद दिला जात नाही, असं लक्ष्मीकांत खाबिया यांनी म्हटलं आहे.

EVM CCTV News
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले,"बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम (EVM) मशिन्स ज्या गोदामात ठेवलेले आहे. ज्या गोदामाचे सीसीटीव्ही सकाळी 10:25 पासून 45 मिनिटांपासून बंद होते. त्यामुळे यामध्ये काही गडबड तर नाही ना यासारखी शंका येत आहे."

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा खुलासा -

सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याच्या बातमीवर खुलासा केला असून इलेक्ट्रिशन वायर काढल्यामुळे फक्त डिस्प्ले युनिट बंद होतं. मात्र त्या कालावधीमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वीत होती, त्यावेळेचे फुटेज उपलब्ध आहे. त्यामध्ये कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचं त्यांनी खुलासा केला आहे

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com