Shirur Loksabha News : अमोल कोल्हेंचा दुसरा व्हिडिओ आला; आढळराव आता तरी शब्द पाळणार ?

Shivajirao Adhalrao Patil संरक्षण खात्याला विविध साहित्य पुरवणाऱ्या कंपनीचे मालक आणि तत्कालीन खासदार आढळराव पाटील यांनी 29 एप्रिल 2016 ला विचारलेला प्रश्न या व्हिडीओत जनतेसमोर मांडला आहे.
Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patil
Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patilsarkarnama

-सागर आव्हाड

Shirur News : शिरुर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आव्हान स्वीकारल्यानंतर आज दुसरा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. आढळराव पाटील आपल्या खासदारकीचा वापर कश्या पद्धतीने स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी करत होते हे या व्हिडिओत पुराव्यासह स्पष्ट केलं आहे.

जुन्नर तालुक्यातील ओतूरमध्ये जाहीर सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या खासदारकीच्या काळात स्वतःच्या कंपनीचा फायदा लक्षात घेत, केवळ संरक्षण खात्याविषयी कसे प्रश्न विचारले असं सांगत, आढळराव पाटील हे लोकप्रतिनिधीच्या वेषातील व्यापारी असल्याचा आरोप केला होता.

यावर आढळराव पाटीलांनी डॉ. कोल्हेंना पुरावे सादर करा, अस आव्हान दिल होत. हे आव्हान स्वीकारत डॉ. कोल्हे आढळराव पाटलांनी केवळ सरंक्षण खात्याविषयी विचारले प्रश्न जनतेसमोर मांडत आहेत. आज, याच संदर्भातला दुसरा व्हिडीओ डॉ. कोल्हेंनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये डॉ. कोल्हे सांगतात, डायनालॉग ही आढळराव पाटलांची जी कंपनी आहे. त्या कंपनीच्या वेबसाईटवर हे सर्व माहिती उपलब्ध आहे.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patil
Shirur Loksabha News : आढळराव-कोल्हेंतील संघर्ष गेला टोकाला; आता थेट उमेदवारी मागे घेण्याचे दिले आव्हान...

संरक्षण खात्याला विविध साहित्य पुरवणाऱ्या कंपनीचे मालक आणि तत्कालीन खासदार आढळराव पाटील यांनी 29 एप्रिल 2016 ला विचारलेला प्रश्न या व्हिडीओत जनतेसमोर मांडला आहे. भारत सरकारने संरक्षण खात्याला लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीचे धोरण तयार केलं आहे का? यामध्ये भारतीय कंपन्यांसाठी धोरण आहे का? आणि केलं असेल तर त्याची सविस्तर माहीती द्यावी. असा प्रश्न आढळराव पाटलांनी विचारला आहे. या प्रश्नांचा आणि शिरुर लोकसभेचा काय संबंध याचं उत्तर आढळराव पाटलांनी द्यावं, अस, आव्हान पुन्हा एक्दम डॉ. कोल्हे यांनी केलं आहे.

आढळराव पाटलांसाठी मत मागणाऱ्या नेत्यांनी उत्तरं द्यावीत...

निवडणूक प्रचारात माझ्याबद्दल नेता की अभिनेता हा प्रश्न अनेक जण विचारतात, असे सांगत डॉ. कोल्हे म्हणाले की, आता शिवाजीराव आढळराव पाटलांसाठी मत मागणाऱ्या नेत्यांनी आता उत्तर द्यावीत की, नेत्याच्या रुपात स्वतःच्या कंपनीचे उखळ पांढर करणारा लोकप्रतिनिधी हवा, की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणार लोकप्रतिनिधी हवा. तेव्हा आता आढळराव पाटील दिलेला शब्द पाळणार का. आणि त्यांच्यासाठी मत मागणाऱ्या नेत्यांना याची कल्पना आहे का? असे प्रतिसवाल डॉ. कोल्हे यांनी केलेत.

Edited By : Umesh Bambare

Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patil
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com