Supriya Sule, Nitesh Rane
Supriya Sule, Nitesh Rane Sarkarnama
पुणे

Nitesh Rane slams Supriya Sule : सुप्रियाताई, माझ्या बहिणीला भेटायला कधी जाणार ? ; राणेंचा सवाल ; पुण्यात लव्ह जिहाद..

सरकारनामा ब्यूरो

Nitesh Rane on Pune love jihad : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटानंतर राजकारणही सुरु असतांना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंचर जिल्ह्यात लव जिहाद प्रकरण घडल्याचा दावा नुकताच केला आहे. असाच प्रकार पुण्यातील घोरपडी परिसरात घडल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी आज (रविवारी) पुण्यात आंदोलन केले.

आंदोलनानंतर नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी राणेंनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. मुंबई ड्रग्स पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा (sharukh khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan case) जामिनीवर सुटला आहे.

या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती. तो धागा पकडत नितेश राणेंनी आज सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. आंदोलनानंतर नितेश राणे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली.

"आर्यन खानबाबत जे घडलं ते एक आई म्हणून वाईट वाटतं. ज्याच्याकडे काहीच सापडले नाही त्याला 26 दिवस कोठडी ठेवण्यात आलं, हा कुठला न्याय ? असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी उपस्थितीत केला होता. त्यांनी आर्यन खानची पाठराखण केली होती. या घटनेची आठवण राणेंनी सुळेंना करुन दिली. "शाहरुख खानच्या मुलांचे समर्थन करणाऱ्या सुप्रिया सुळे या घोरपडीतील माझ्या पीडीत बहिणीला कधी भेटायला येणार" असा सवाल राणेंनी सुळेंना केला आहे.

तीन दिवसापूर्वी मंचर येथील मुस्लिम समाजातील एका तरुणाने अल्पवयीन तरुणीला चार वर्षापुर्वी पळवून नेऊन अत्याचार केल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. “मंचर येथील पीडित तरुणीची ओळख तिच्या मैत्रिणीच्या भावाशी झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले.

पीडित मुलीच्या घरच्या मंडळींना माहिती मिळाल्यावर आरोपी तरुणाला समज देखील देण्यात आली होती.मात्र त्यानंतर आरोपी मुलाने पीडित मुलीस फुस लावून पळवून उत्तरप्रदेशला घेऊन गेला. त्या घटनेला जवळपास चार वर्षाचा कालावधी लोटला.त्याकाळात पीडित मुलीच्या घरातील मंडळींनी वेळोवेळी पोलिसांकडे दाद मागितली पण योग्य प्रकारे तपास झाला नाही” अशी माहिती पडळकर यांनी दिली.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे

'आर्यन खानबाबत जे घडलं त्याबद्दल एक आई म्हणून वाईट वाटतं. ज्याच्याकडे काहीच सापडले नाही त्याला 26 दिवस कोठडी ठेवण्यात आलं, हा कुठला न्याय? समाजाने याचा विचार करण्याची गरज असून केंद्राला जाब विचारला पाहिजे. आर्यन खानबाबत मीडिया ट्रायल व्हायला नको होती,

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT