Pune Bjp entry  Sarkarnama
पुणे

Pune municipal election: पुण्यात भाजपचा ठाकरे सेनेला मोठा धक्का; चंद्रकांत पाटलांनी सेनेच्या अधिकृत उमेदवारालाच दिला पक्षात प्रवेश

Shiv Sena BJP entry News : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाले आहे. निवडणुकीच्या काळातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 9 आणि 11 मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकृत व बंडखोर उमेदवारांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या कोथरुड येथील निवासस्थानी सोमवारी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. कोथरुड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 9 (क) आणि 9 (ड) तसेच प्रभाग क्रमांक 11 (अ) मधील ठाकरे सेनेचे उमेदवार, बंडखोर उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यामध्ये प्रभाग क्रमांक 9 मधील ठाकरे सेनेचे बंडखोर उमेदवार महेश सुतार (ड), पूजा सुतार (क), नियोजन समितीचे सदस्य सुखदेव तापकीर, तसेच प्रभाग क्रमांक 11 (अ) मधील अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे, विद्यार्थी सेनेचे अमर गायकवाड आणि माजी नगरसेवक दिलीप गायकवाड यांचा समावेश आहे. या पक्षप्रवेशावेळी भाजप (BJP) उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, अजय मारणे, अभिजीत राऊत उपस्थित होते.

प्रचाराच्या धामधुमीला सुरुवात झाली असताना पक्षातील उमेदवारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला कोथरूड परिसरात धक्का बसला आहे. या सर्व घडामोडीचा परिणाम आगामी काळात होत असेलल्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.

याबाबत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 'यापूर्वीच भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता प्रभाग क्रमांक 9 आणि 11 मधील उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद दुपटीने वाढली आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाची ही नांदी आहे.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT