ShivSena Bhavan : राज ठाकरेंनी जागवल्या सेनाभवनातील जुन्या आठवणी; 'ठाकरी' शैलीत जुन्या संघर्षाचा वाचला पाढा !

Raj Thackeray return after 20 years News : यावेळी जुन्या सेनाभवनाच्या स्मृतींमुळे राज ठाकरे हे काहीवेळ भावूक झाले पण आक्रमकपणे त्यांनी टीका केल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
Uddhav Thackeray, Raj Thackeray
Congress and Thackeray Sena leaders during a key meeting on Kolhapur municipal election seat sharing amid MVA alliance discussions.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मनसेचे प्रमुख राज ठाकरे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले असून दोन्ही पक्ष मिळून वचननामा जाहीर केला. यादरम्यान राज ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. राज ठाकरे तब्बल 20 वर्षानंतर सेना भवनात दाखल झाले. यावेळी त्यांनी त्या काळातील आठवणी सांगितल्या. यावेळी जुन्या सेनाभवनाच्या स्मृतींमुळे राज ठाकरे हे काहीवेळ भावूक झाले पण आक्रमकपणे त्यांनी टीका केल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

जुन्या शिवसेना भवनातील आठवणी या रोमांचकारी आहेत. आनंददायी आणि अशा त्या आठवणींना… तुमच्यासोबत बसलो तर इतक्या गोष्टी सांगता येतील पूर्वी पासूनच्या. 77 साली शिवसेना (Shivsena) भवन झाले. तेव्हाच जनता पक्षाचे सरकार आले होते. ती सभा झाल्यावर सेना भवनावर दगडफेक झाली होती. तेव्हापासूनच्या आठवणी आहेत, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
BJP AB Form Scam : एबी फॉर्म वाटप गोंधळाची चौकशी होणार, भाजपचा बडा नेता नाशिकमध्ये..कुणाची वाढली धडधड?

शिवसेना भवनात पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे (Raj Thackeray) काहीसे भावूक झाले होते. संजय राऊतांच्या वक्तव्याचा संदर्भ देत ते म्हणाले, संजय राऊत वारंवार 20 वर्षांनंतर आलो असे म्हणत आहेत, मला तर जेलमधून सुटून आल्यासारखं वाटत आहे. मी नवीन शिवसेना भवन पहिल्यांदाच पाहत आहे, कारण माझ्या सर्व आठवणी जुन्या वास्तूशी जोडलेल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Raj-Uddhav Thackeray : राज-उद्धव यांच्या युतीने मुंबईत महायुतीचे टेन्शन वाढले; 67 वॉर्डांत भाजप-शिंदेंचा खेळ बिघडणार?

शिवसेना भवन येथे शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीचा एक संयुक्त जाहीरनामा प्रकाशित झाला आहे. आदित्य आणि अमित ठाकरे यांनी या वचननाम्यातील गोष्टी सांगितल्या आहेत. त्यावर परत किती चर्चा करायची याचा विचार करावा, असे राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट करीत पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नला उत्तरे दिली.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Rahul Narvekar controversy : राहुल नार्वेकरांची अडचण वाढली, उद्धव ठाकरेंनी थेट मुद्याला हात घातला; विधानसभा अध्यक्षपद जाणार?

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणूक मनसे आणि शिवसेना ही एकत्रित लढत आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची मनसे व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त जाहीरनाम्याचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनाभवन येथे रविवारी करण्यात आले. 'शिवशक्तीचा वचननामा, ठाकरेंचा शब्द' अशी त्यांच्या जाहीरनाम्याची टॅगलाईन आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लबोल केला.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Raj Thackeray : तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनाची पायरी चढले, कारणही खास

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com