Katraj Posters Sarkarnama
पुणे

Pune News : कात्रजमध्ये मोरे, शिवतारेंविरोधात पोस्टरबाजी; दिले खुले आव्हान...

Sudesh Mitkar

Pune News : काही दिवसांपासून शहरातील राजकीय पोस्टरबाजी वाढली असून, आपल्या विरोधकाला नामोहरम करण्यासाठी पोस्टर लावण्याचा ट्रेंड सध्या पुण्यामध्ये जास्तच पाहायला मिळत आहे. आजदेखील कात्रज परिसरामध्ये मनसे सोडलेल्या वसंत मोरे यांच्या प्रभागात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुले आव्हान देणाऱ्या माजी आमदार विजय शिवतारे यांना आव्हान देणारेदेखील बॅनर कात्रज परिसरात पाहायला मिळत आहेत.

वसंत मोरे यांनी मनसेला राम राम केल्यानंतर मोरे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीसाठी घेत आहेत. मोरे यांचा अद्याप पक्ष ठरलेला नसला तरी मोरे यांच्या जाण्याने मनसेचं मोठं नुकसान झालं असल्याचं बोललं जात आहे. खास करून कात्रज परिसरामध्ये मोरे यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने कात्रज हा मनसेचा बालेकिल्ला झाल्याचं बोललं जात होतं.

कात्रज परिसरात मनसेला मोठे खिंडार पडल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अशातच मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून कात्रज परिसरात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. पोस्टरमध्ये कात्रज हा मनसेचा बालेकिल्ला होता आणि राहणार असं लिहिण्यात आलं आहे. या माध्यमातून एक प्रकारे वसंत मोरे यांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न मनसे पदाधिकाऱ्यांनी केल्याचं बोललं जात आहे. मनसेचे संघटक गणेश नाईकवाडे यांनी ही पोस्टरबाजी केली आहे.

शिवतारे यांच्या बॅनरला राष्ट्रवादीचे उत्तर

बारामती हे काय पवार कुटुंबीयांची जहागीरदारी नाही, असे म्हणत लोकसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याचे माजी मंत्री आणि मुख्यमंत्री शिंदे गटाचे समर्थक विजय शिवतारे यांनी जाहीर केले आहे. त्यांनी जाहीर केलेल्या उमेदवारीमुळे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.

शिवतारे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवतारे यांना बोलून दोन दिवस शांत बसण्याची विनंती केली होती. मात्र, असे असतानाही सासवड येथे झालेल्या अजित पवारांच्या सभेच्या ठिकाणी शिवतारे यांचे बॅनर्स लागले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर आता शिवतारेंना टार्गेट करणारे बॅनर कात्रज परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहेत. यामध्ये " दादाच ठरवतात पुरंदरचा विजय"चे ठळकपणे घेण्यात आलेले आहे. पोस्टरमध्ये खाली "नावात विजय पुरेसा नाही, दादांच्या मनातही असावा लागतो" ते लिहून शिवतारे यांना वाचण्याचे काम राष्ट्रवादीकडून करण्यात आलेले आहे. हे पोस्टर राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राकेश कामठे यांनी लावले आहेत.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT