Pune Corporation : क्रीडांगणाची जागा कात्रज डेअरीला देण्याचा घाट? पुणे पालिकेविरोधात महाविकास आघाडी आक्रमक

PMC News : पालिका आयुक्तांनी राजकीय दबावापोटी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप
Pune Congress
Pune CongressSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : कात्रज येथील मैदानाचे आरक्षण उठवून त्याजागी दूध डेअरी व प्रक्रियेसाठी आरक्षण टाकण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. यामुळे या भागातील मुलांना खेळण्यासाठी मोकळे मैदान उपलब्ध राहणार नाही. याचा निषेध करण्यासाठी, तसेच झोपलेल्या महापालिकेला जागे करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.

पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी) कात्रज परिसरात मैदानासाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या या मैदानामध्ये अनेक मुले खेळत असतात. मात्र आता मैदानाचे आरक्षण बदलण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी घेतला आहे. पालिका आयुक्तांनी राजकीय दबावापोटी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला जात आहे. हे आरक्षण बदलून डीपीमध्ये मैदानासाठी दाखवण्यात आलेली जागा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संपाला (कात्रज डेअरी) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune Congress
Uddhav Thackeray : ‘मर्द आहे' म्हणायचं अन् रडत बसायचं; सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी भाजपचा ठाकरेंना टोला

महापालिकेने घेतलेल्या या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी, तसेच या भागातील लहान मुलांनीदेखील कडाडून विरोध केलेला. ही जागा कात्रज डेअरीला दिल्यास येथे लहान मुलांना खेळण्यासाठी कोणतेही मोकळे मैदान उपलब्ध असणार नाही. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने पालिका भवनासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Pune Congress
BJP Politics : आता चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री होतील... : काँग्रेसच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी आमदार दीप्ती चवधरी, गोपाळ तिवारी, अभय छाजेड, संगीता तिवारी यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, 'शहरामधे मुलांना खेळण्यासाठी पुरेशी क्रीडांगणे नाहीत. असे असताना जी जागा क्रीडांगणसाठी आरक्षित आहे. त्या जागेवरचे आरक्षण काढून ही जागा कात्रज डेअरीला देण्याचा घाट का घातला जात आहे. ही जागा महापालिका देणार असेल तर ते पुणेकरांच्या हिताचे नाही. हे होऊ नये, यासाठी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. शहरात खेळासाठी मैदानाची कमतरता भासत असताना ही जागा कात्रज डेअरीच्या व्यावसायिक वापरासाठी काढून घेणे योग्य नाही.'

(Edited by Sunil Dhumal)

R...

Pune Congress
Thane ShivSena News : ठाण्यात धाकधूक, महाआरती करत बाप्पाला साकडे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com