Rishikesh Vaidya Arrested: Sarkarnama
पुणे

Rishikesh Vaidya Arrested: खरातनंतर आणखी एका भोंदूबाबाला अटक, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Pune Police News, Rishikesh Vaidya arrest: खरात प्रकरण समोर आल्यानंतर पीडित महिलेने हिम्मत दाखवून आपल्या पतीला घडलेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर वैद्य यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

Mangesh Mahale

Pune Police News: नाशिक मधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच आणखी एका भोंदूबाबाचे प्रकरण समोर आले आहे. "मी महादेवाचा अवतार असून तू माझी पार्वती आहेस," असे सांगत महिलेवर अत्याचार करणाारा स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी पिंपरी येथून अटक केली आहे.

35 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून त्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात बुधवारी संध्याकाळी पीडीत महिलेने फिर्याद दिली होती. हा गुन्हा पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता.

खरात प्रकरण समोर आल्यानंतर पीडित महिलेने हिम्मत दाखवून आपल्या पतीला घडलेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर वैद्य यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर वैद्य हा फरार होता. त्याला शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता पुणे पोलिसांनी अटक केली.

वैद्य याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाची त्याला बेल मिळणार की जेल होणार हे आज दुपारी समजेल. पुणे पोलिसांनी त्याला दोन दिवस अटक केली नव्हती. माध्यमांमध्ये वैद्यच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर तो फरार झाला होता. माणिकपूर पोलासांच्या मदतीने पुणे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. माणिकपूर पोलिसांनी वैद्य यांचे लोकेशन काढून दिले. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला अटक केली.

या प्रकरणात वैद्य यांच्या अत्याचाराला ही पीडित महिला एकटीच आहे की आणखी काही महिला त्यांच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत, हो पोलिस तपासात समोर येईल. शुक्रवारी सकाळपासून पुणे पोलिसांचे विविध पथकं वैद्य याचा मागावर होते.

काय आहे प्रकरण

  • पीडित महिला ३५ वर्षांची असून पुण्यात वास्तव्यास आहे.

  • २०२३ मध्ये तिची वसई येथील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्याशी ओळख झाली होती.

  • पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा वैद्य याने फायदा घेत तिच्याशी मैत्री करून जवळीक केली.

  • अध्यात्म शिकविण्याच्या बहाण्याने डिसेंबर २०२३ मध्ये तो तिला भेटण्यासाठी पुण्यात आला.

  • "मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहेस," असे तिला सांगितले.

  • पुण्यातील मांजरी येथील एका लॉज मध्ये नेले आणि तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT