Pune Hit And Run Case : पुण्यातील कल्याणी नगर येथील 'हिट अँड रन' प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आल्यावर आत्ता अजून एकाला अशाच पद्धतीने सुरेंद्र कुमार अगरवाल यांनी धमकी दिल्याचं समोर आलं आहे. याबाबत 2021 पासून अर्जदार मुश्ताक शब्बीर मोमीन हे पुणे पोलिसांना, तसेच सीबीआय यांना अर्ज देत असून आत्ता पुन्हा त्यांनी पुणे पोलिसांना याबाबत अर्ज दिला आहे.
ब्रह्मा बिल्डर्सचे मालक आणि अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अगरवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती उघड झाली होती. भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात सुरेंद्र अगरवाल यांनी छोटा राजनची मदत घेतली होती. या प्रकरणी अजय भोसले यांच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्र कुमार अगरवाल यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. (Agarwal family Connection with Underworld)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हे प्रकरण 2009 मध्ये हे प्रकरण झालं होत.त्यानंतर याच सुरेंद्र कुमार यांनी 2021 मध्ये एका व्यवहाराबाबत मुश्ताक मोमीन यांची आर्थिक फसवणूक करीत त्याला ऑफिस वर बोलवून तुला मारून टाकेल अशी धमकी दिल्याचा आरोप आता समोर आला आहे.
याबाबत अर्जदार मुश्ताक मोमीन म्हणाले की, सुरेंद्र अगरवाल, विशाल अगरवाल(Vishal Agarwal) आणि जसप्रीत सिंग राजपाल यांना कोंढवा येथील एका जागेचा वादविवाद मिटवून ताबा मिळवून दिला होता आणि यासाठी आमच्यात आर्थिक व्यवहार देखील झाले होते. 1 ऑगस्ट 2021 मला अगरवाल यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावलं आणि अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली व म्हणाले "तुझी लायकी नाही, तु काय काम केलस? मी तुला दीड कोटी रूपये देणार नाही तुला जायचे तिथे जा, तू माझं काहीही वाकड करू शकत नाही, माझी ओळख खूप वरपर्यंत आहे, अंडरवर्ल्डशी माझे डायरेक्ट संबंध आहेत, पोलीस मी खिशात घेवून फिरतो. तुझा अजय भोसले करीन, त्याला जसा ठोकला तसा तुलाही ठोकीन, तो वाचला पण तु वाचणार नाहीस, तुला खल्लास करून टाकीन.'
तसेच, 'तुला आणि तुझ्या परिवाराला जगण्याची इच्छा असेल तर मी जेवढे दिले तेवढयात समाधान मान नाहीतर तुला आणि तुझ्या परिवाराला जीवानीशी हात धुवावा लागेल, माझ्या नादाला लागू नको, तुला खंडणीच्या प्रकरणात अडकून टाकेल व जेलची हवा खायला लावेल" अशी धमकी दिली असल्याचं यावेळी मोमीन यांनी सांगितल आहे.
ते पुढे म्हणाले की याबाबत 2021 पासून मी पोलीस स्टेशन,पुणे पोलीस आयुक्त तसेच सीबीआय,राज्यपाल यांना पत्र देत आहे. तरीही मला अजूनही न्याय मिळालेला नाही.आत्ता हे अपघाताचं प्रकरण समोर आल्यावर आज पुन्हा मी पुणे पोलिसांकडे(Pune Police) अर्ज केला असून मला न्याय मिळावा, असं मोमीन म्हणाले आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.