Pune Shiv Sena  Sarkarnama
पुणे

Pune Shiv Sena : धंगेकरांच्या पाठोपाठ पुण्यातील ठाकरे गटाचा आणखी एक नेता शिंदेसेनेच्या वाटेवर

Sulbha Ubale Shiv Sena Thackeray Pune Eknath Shinde Shiv Sena Mumbai : पुण्यातील शिवसेना ठाकरे सेनेच्या सुलभा उबाळे आज मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज प्रवेश करणार आहेत.

Sudesh Mitkar

Pune News : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवडमधील फायर ब्रँड नेत्या शिवसेनेच्या गळाला लागल्या आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे आज शिंदेच्या शिवसेना प्रवेश करणार आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या शिवसेना (Shivsena) ठाकरे सेनेच्या ज्येष्ठ नेत्या आणि महिला जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सायंकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या अधिकृतरित्या पक्षप्रवेश करतील.

उबाळे यांच्यासोबत शहरातील काही पदाधिकारी आणि युवा सेनेचे कार्यकर्तेही शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत जाणार आहेत. पक्षाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे हा निर्णय घेतल्याचे उबाळे यांनी स्पष्ट केले.

सुलभा उबाळे म्हणल्या, "पुणे शहरातील तीनही मतदार संघ पक्षाने सोडून दिले आहेत. त्यामुळे शहरात पक्षाचे अस्तित्वच शिल्लक नाही. पक्षनेतृत्व शहराकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे काम करण्यास थोडी सुद्धा संधी शिल्लक नाही. त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज सायंकाळी शिवसेनेत प्रवेश करणार आहे".

सुलभा उबाळे यांची राजकीय कारकीर्द पाहिल्यास शाखाप्रमुख ते पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक, विरोधी पक्षनेता, उपसभापती, स्थायी समिती सदस्य, गटनेता, शहर संघटिका, उपजिल्हा संघटिका, जिल्हा संघटिका असा राहिला आहे. 2009 मध्ये आणि 2014 मध्ये भोसरी विधानसभा निवडणूक लढवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT