Pune News : राज्य सरकारकडून राज्यातील 12 आयएएस दर्जाच्या अधिकार्यांच्या गुरुवारी (ता.2) बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या बदलीचाही समावेश आहे. त्यांच्याजागी आता जितेंद्र डुडी हे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी (Collector) असणार आहे. दिवसे हे अजित पवारांच्या 'गुडबुक'मधील अधिकारी म्हणून ओळखले जातात. याच सुहास दिवसेंची अवघ्या 11 महिन्यातच पुण्याच्या जिल्हाधिकारीपदावरुन बदली करण्यात आली आहे.
पण हेच दिवसेंवर जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना करण्यात आलेल्या दोन गंभीर आरोपांमुळे चांगलेच चर्चेत आले होते. त्यातलं एक गंभीर प्रकरण म्हणजे वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) हे होतं.तर दुसरं प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी आपल्यावर आत्महत्येची वेळ आल्याचे गंभीर आरोप केले होते.
काही महिन्यांपूर्वी वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरने वाशिम येथे तत्कालीन जिल्हाधिकारी सुहास दिवसेंविरोधात वाशिम येथे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात काम करताना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप करत मोठी खळबळ उडवून दिली होती.
खेडकर यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर व्हावा यासाठी अर्ज केला होता. 'ते मला एकटीला खोलीत बोलावत होते', त्यासाठी नकार दिल्यानंतर त्यांनी आपली बदली करण्यासाठी राज्य सरकारकडे अहवाल पाठविला, असा आरोप खेडकर यांनी केला होता.
या आरोपांना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी उत्तर ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर या 3 ते 14 जूनपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित होत्या. या कालावधीत आपण खेडकर यांना मोजून तीनवेळा भेटलो होतो. या सर्व भेटी प्रशासकीय कामाच्या होत्या. यावेळी आमच्याबरोबर इतर अधिकारी तसेच वकील देखील उपस्थित होते. पूजा यांनी केलेले सर्व आरोप रचलेले असून बिनबुडाचे आहेत, असल्याचे स्पष्ट केलं होतं.
जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची नियुक्ती असताना पूजा यांना आपण एकटा असताना कधीही भेटलो नाही. किंवा एकटा असताना कधीही चर्चा केलेली नाही. 14 जूननंतर पूजा यांना विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात जाण्यास सांगण्यात आले होते. तेथे रुजू होताना पूजा यांनी कोणताही आरोप केला नाही. त्यांच्याबद्दल आपण राज्य सरकारला पत्र लिहिले होते.तसेच त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकरवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशाराही दिला होता.
त्याआधी पुण्याचे 'कलेक्टर' झाल्यावर सुहास दिवसेंवर त्यांच्याच 'टीम'मधील प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी गंभीर आरोप केले होते.'राष्ट्रवादीच्या एका आमदाराच्या सांगण्यावरून दिवसे हे मानसिक छळ करीत आहेत.दिवसेंच्या त्रासामुळे माझ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे,असे जाहीरपणे सांगून कट्यारे यांनी प्रशासनात खळबळ उडवून दिली होती.
आमदार मोहिते यांची कामे करीत नसल्यानेच ही वेळ आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. म्हणजे, अजित पवारांचे समर्थक आमदार मोहिते आणि दिवसे हे जाणीवपूर्वक त्रास देत असल्याची बाब कट्यारे यांच्या पत्रातून दिसते. परिणामी, या प्रकरणाची चौकशी होऊन नेमके सत्य बाहेर येईल. मात्र, त्याआधी या 'व्हायरल' पत्रामुळे जिल्हा प्रशासनाच्या कारभाराची चर्चा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.