Pune News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही तासांमध्ये लागू शकते, ही आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारकडून विविध प्रकल्पांच्या घोषणा करण्यात येत आहेत. पुणे शहरातील मेट्रोच्या विस्तारालादेखील मान्यता देण्यात आली असून, समाविष्ट 34 गावांमधील वाढीव टॅक्स वसुलीलादेखील स्थगिती देण्यात आली आहे. सरकारच्या या घोषणांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे.
आज पुणे महानगरपालिकेच्या जाचक टॅक्सचा निषेध करण्यासाठी शिवणे, उत्तमनगर, कोंढवे, कोपरे या भागातील व्यापारी, मी व ग्रामस्थांनी ढोल मोर्चाचे आयोजन केलं होतं. ढोल वाजवत मोर्चा काढत या वेळी जाचक करामध्ये सूट मिळावी, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. या मोर्चाला पाठिंबा दर्शवत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोर्चात सहभाग घेतला.
सरकारकडून ही जाचक कर वाढ जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याचं आश्वासन स्थानिक रहिवाशांना दिले. या वेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने समाविष्ट 34 गावांतील वाढीव टॅक्स आकारणीला स्थगिती दिली आहे. मात्र, तो रद्द केला अथवा टॅक्स माफी सरकारने दिलेली नाही.
सध्या बऱ्याच गोष्टी घडत आहेत. पाण्याचा पाऊस पडला नाही, मात्र सरकारकडून गाजराच्या पावसाची बरसात होत आहे. कारण निवडणुका चार दिवसांवरती आल्या आहेत. लोकसभा निवडणुका आज उद्यामध्ये जाहीर होणार होत्या. मात्र, इलेक्शन कमिशनच्या प्रमुखांनी राजीनामा दिला आहे. लोकसभेसारखं देशासाठी सर्वात महत्त्वाची असणारी निवडणूक प्रक्रिया ज्यांनी राबवायची होती, त्यांनी राजीनामा दिला आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
इलेक्ट्रॉल बॉण्डच्या भ्रष्टाचाराचं प्रकरणदेखील समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकार कन्फ्यूज झाले असून, समाविष्ट गावांना वाढीव करातून सूट देण्याऐवजी करवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्याचं काम केलं आहे. स्थानिक रहिवासी हे कर भरायला तयार आहेत. परंतु महापालिकेने आकारलेला दहा पट कर ते भरणार नाहीत.
पिंपरी- चिंचवड आणि डोंबिवली महापालिकांनी ज्या प्रकारे वाढीव करांमध्ये सवलत दिली आहे, त्याचप्रमाणे महापालिकेत नव्याने समाविष्ट 34 गावांना ही सूट देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अन्यथा कोर्टाची लढाई लढण्यासाठी आम्ही समर्थ असल्याचा इशारादेखील सुप्रिया सुळे यांनी या वेळी सरकारला दिला.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.