Ravindra Dhangekar Sasoon News : Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar Sasoon News : ड्रग तस्कर ललितला संरक्षण देणाऱ्या 'त्या' मंत्र्यांवर कारवाई करा; धंगेकरांची मागणी!

Ravindra Dhangekar Sasoon News : "पुणे शहराची बदनामी रोखायची असेल तर दोषींवर कारवाई होणे गरजेचे.."

Chetan Zadpe

Pune News : शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून पुणे शहराची ओळख सर्वत्र आहे. मात्र ड्रग्ज माफीया ललित पाटील प्रकरणामुळे आता पुण्याची बदनामी होऊ लागली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास तातडीने झाला पाहिजे. या प्रकरणाचे धागेदोरे सरकारमधील मंत्र्यांपर्यंत पोहचलेले आहेत. पाटील याला संरक्षण देणाऱ्या 'त्या' मंत्र्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली. (Latest Marathi News)

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात पहिल्या दिवसापासून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगत आहे. तरुणाईला व्यसनाच्या आहारी जबाबदार असलेल्या ड्रग्ज माफीया ललित पाटील याला मदत करणारे पोलिस अधिकारी, डॉक्टर यांच्यासह इतर सर्व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका आमदार धंगेकर अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून मांडत आहेत. यासाठी त्यांनी आंदोलन देखील केले होते. मात्र ढिम्म प्रशासन काहीही कार्यवाही न करता शांत बसून आहे.

हिवाळी अधिवेशनाची सांगता होण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक राहिलेले असतानाही सत्ताधारी पक्षाचे नेते यावर एक चकार शब्द बोलण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. सोमवारी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या पक्षाच्या वतीने विधिमंडळाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये ललित पाटील वर कारवाई करण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली.

पुणे शहराची बदनामी रोखायची असेल आणि शहराचा लौकीक कायम ठेवायचा असेल तर या प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. चौकशीत दोषी ठरलेले 'ससून'चे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना सरकार का पाठीशी घालत आहे? त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT