Ravindra Dhangekar audio clip controversy Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar Warns BJP : ऑडिओ क्लिपमुळे रवींद्र धंगेकर संतापले, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना अल्टीमेटम! म्हणाले, ' रोज पोलखोल करू'

Ravindra Dhangekar ultimatum to Ravindra Chavan : विजय चौधरी यांच्या वादग्रस्त ऑडिओ क्लीपनंतर रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपला पोलखोल करण्याचा इशारा दिला आहे.

Roshan More

Ravindra Dhangekar press conference: धुळे-नंदूरबार भागातील भाजप नेते विजय चौधरी आणि आमदार अमरीश पटेल यांच्यात झालेल्या कथित संवादाची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या कथित ऑडिओ क्लिपवरून महायुतीत नवा वाद निर्माण झाला आहे.

या ऑडिओमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि एकेरी भाषेत उल्लेख करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. तसेच "लाडकी बहीण योजनेमुळेच ते आमदार झाले, अन्यथा पराभूत झाले असते," असा उल्लेखही या कथित संभाषणात असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. धंगेकर म्हणाले, "आज भाजप सत्तेत आहे, ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या 'लाडकी बहीण' योजनेची कृपा आहे. राज्यातील लोकप्रिय आमदारांची यादी केली, तर उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अव्वल स्थानी दिसतील. त्यामुळे भाजपने शिवसेनेचे आभार मानावेत आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेविरोधातील वक्तव्ये तातडीने थांबवावीत."

धंगेकर पुढे म्हणाले, "आमचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबाबत भाजपचे विजय चौधरी आणि अमरीश पटेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा मी जाहीर निषेध करतो. अशी विधाने आम्ही कधीच खपवून घेणार नाही."

लाडकी बहीण योजनेचे श्रेयही धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांनाच दिले. "लाडकी बहीण योजना तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी सुरू केली. या योजनेमुळेच भाजपसह महायुतीचे अनेक आमदार निवडून आले. त्यामुळे या योजनेचे श्रेय शिंदे यांनाच जाते, हे वारंवार आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या भाजपच्या वाचाळ नेत्यांनी लक्षात ठेवावे," असे ते म्हणाले.

उदय सामंत यांच्या कामकाजाचे कौतुक करत धंगेकर म्हणाले, "राज्याच्या विकासासाठी आणि उद्योगवाढीसाठी सातत्याने झटणारा नेता अशी उदय सामंत यांची जनमानसात प्रतिमा आहे. त्यांनी कायम जनतेच्या हिताला प्राधान्य दिले आहे. अशा नेत्यांवर आक्षेपार्ह विधाने करून स्वतःला प्रसिद्धी मिळवण्याचा हा चौधरी आणि पटेल यांचा केविलवाणा प्रयत्न आहे."

रवींद्र चव्हाणांना इशारा

यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनाही थेट इशारा दिला. "भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन पक्षशिस्त न पाळणाऱ्या संबंधितांना जाब विचारावा. अन्यथा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कारनामे पुराव्यांसह दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर आणू," असा इशारा धंगेकर यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT