Latur Politics : दिवंगत नेते शिवराज पाटील चाकूरकरांच्या पुतळ्यावरून काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली; महापालिकेत की बाहेर? यावरून वाद!

Shivraj Patil Chakurkar statue controversy : महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांचा पुतळा महापालिकेत उभारण्यासाठी ठराव पाठवा, त्याला राज्य शासन निधी देईल अशी घोषणा केली होती. त्यामुळे हा पुतळा महापालिकेतच झाला पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे.
Latur Municipal Corporation statue row
Latur Municipal Corporation statue rowSarkarnama
Published on
Updated on

BJP and Congress clash in Latur: काँग्रेसचे दिवंगत नेते माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पुतळ्यावरुन राजकारण सुरू झाले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी काँग्रेसने शिवराज पाटील चाकूरकरांच्या पुतळ्याचा विषय थेट विषय पत्रिकेवर आणला आहे. त्यात हा पुतळा आदर्श कॉलनीत बसवण्याचा मानस आहे.

पण विरोधी पक्ष भाजपचा त्याला तीव्र आक्षेप आहे. हा पुतळा महापालिकेतच झाला पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. यावरुन आता भाजपने काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वालाच टार्गेट केले आहे. महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांचा पुतळा महापालिकेत उभारण्यासाठी ठराव पाठवा, त्याला राज्य शासन निधी देईल अशी घोषणा केली होती.

त्यामुळे हा पुतळा महापालिकेतच झाला पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे. पण बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चाकूरकर यांचे स्मारक आदर्श कॉलनीत करण्या संदर्भात नागरिकांच्या सूचना मागवून आराखडा तयार करणे व शासनाकडून निधी उपलब्ध करुन घेणे हा विषय ठेवण्यात आला होता. याला भाजपाने तीव्र आक्षेप घेतला.

Latur Municipal Corporation statue row
Riya Ahir: थेट मुंबई पोलिसांची व्हॅन अडवण्याची डेअरिंग दाखवणारी तरुणी; कोण आहे रिया अहीर?

पुतळ्याचे राजकारण ही तर काँग्रेसची परंपरा...

शहरात पुतळ्याचे राजकारण करण्याची काँग्रेसची परंपरा आहे. महात्मा बसवेश्वर पुतळ्याचे राजकारण करण्यात आले. आता दिवगंत नेते शिवराज पाटील चाकूरकरांच्या नियोजित पुतळ्याचे राजकारण केले जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला देखील त्यांचा विरोध आहे. काँग्रेसच्या नेत्यांची मानसिकता यातून दिसते, अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केली आहे.

Latur Municipal Corporation statue row
Latur Congress : भाजप नगरसेवकांना डावलून थेट 28 विषयांना मंजूरी; सत्ताधारी काँग्रेसचा महापालिकेत नवा 'लातूर पॅटर्न'!

चाकूरकर परिवाराच्या सूचनांचा सन्मान करणार

माजीमंत्री आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या सूचनेनुसार, बुधवारी सभेपूर्वी दिवंगत नेते माजीमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पुतळ्याच्या संदर्भाने महापौरांसह काँग्रेसच्या नेत्यांनी 'देवघर' या निवासस्थानी शैलेश पाटील चाकूरकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

चाकूरकर परिवारांच्या दिशा निर्देशांचे पालन महानगरपालिका करेल, असे महापौर जयश्री सोनकांबळे यांनी आश्वस्त केले. येत्या चार दिवसांमध्ये परिवारांच्या सर्व सदस्यांशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगीतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Harshvardhan Patil-Balasaheb Thorat
MNS BJP political conflict
Shivendraraje Bhosale
Latur politics; Shivraj Patil Chakurkar and Shivajirao Patil Nilangekar statue controversy
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com