

Shivsena News : धुळे-नंदूरबार भागातील भाजपाचे नेते विजय चौधरी आणि आमदार अमरीश पटेल यांच्यात झालेल्या कथित संवादाची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. यामध्ये चौधरी आणि पटेल हे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल वादग्रस्त बोलत असल्याचे समोर आले आहे.
या कथित ऑडिओ क्लीप आणि विजय चौधरी यांच्या संदर्भात बोलताना कोण विजय चौधरी? अमरीश पटेल असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. ब्लॅकमेलिंगचा हा नवा धंदा सुरू झाला आहे. या ऑडिओ क्लीपची सत्यता तपासण्यासाठी आपण पोलीसांना अर्ज देणार आहोत.
जर या ऑडिओ क्लीपमध्ये तथ्य असेल, तर माझी बदनामी केली म्हणून विजय चौधरी, अमरीश पटेल यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी भूमिका सामंत (Uday Samant) यांनी माध्यमांशी बोलताना घेतली. यापुर्वी विजय चौधरी यांच्यासोबत गिरीश महाजन, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या संवादाच्या कथित ऑडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाल्या आहेत.
काल विजय चौधरी आणि भाजपचे (BJP) आमदार अमरीश पटेल यांच्यातील वादग्रस्त संवादाचा ऑडिओ समोर आला. यामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबाबत एकेरी उल्लेख करत तो लाडक्या बहीण योजनेमुळे आमदार झाला, नाही तर पडला असता, असा दावा करण्यात आला आहे.
या शिवाय त्यांच्यावर पैशाच्या देवाण-घेवाणीचाही आरोप या दोघांनी केल्याचे दिसते. यावरून पुन्हा राजकारण तापले आहे. या संदर्भात नांदेड दौऱ्यावर असलेल्या उदय सामंत यांना माध्यमांनी छेडले असता त्यांनी वरील इशारा दिला. कोण चौधरी त्यांना ओळखतं कोण? ही ऑडिओ क्लिप योग्य आहे की नाही? यासाठी मी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल करणार असल्याचे सांगीतले.
त्या दोघांमधला संवाद जर खरा असेल तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगायला पाहिजे. चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे की ती ऑडिओ AI ने बनवलेली आहे. ते आता पोलीस शोधून काढतील. हा नवीन ब्लॅकमेलिंगचा कोणी धंदा काढलेला आहे? हे देखील समोर येईल. माझ्याबाबत जे बोललं गेलेलं आहे त्यात तथ्य नाही.
मला 25 वर्षांपासून महाराष्ट्र ओळखतो, मी प्रत्येक निवडणुकीमध्ये मताधिक्याने निवडून आलो आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील जनतेला माझ्यावर विश्वास आहे महाराष्ट्रातील जनतेला उदय सामंत काय आहेत ते माहित आहे. जर ही क्लिप खरी असेल तर मला या दोघांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. या ऑडिओ क्लिपचा पोलिसांनी तपास केला पाहिजे. जर ती खरी निघाली तर आमच्यासारख्यांची बदनामी करत आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असेही सामंत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.