Pune BJP Office Sarkarnama
पुणे

Pune BJP Office : मुरलीधर मोहोळ, धीरज घाटेंना भाजपसाठी कुणी ऑफिस देता का ऑफिस! पण...

Political News : राजकीय गडबड सुरू होण्याच्या काळातच भाजपच्या ऑफिसची मुदत संपली आहे.

Dnyanesh Savant

Pune News : मोदी-शहांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत आजघडीला तब्बल सहा-सव्वासहा हजार कोटी रुपयांची संपत्ती (पक्षनिधी) असल्याचे आकडे आहेत.महाराष्ट्रात चंद्रशेखर बावनकुळेंनीही पक्षाकडे (पक्ष निधी चांगला पैसा जमवल्याचे बोलले जाते.पण,१० वर्षे खासदारकी,सहा आमदार,शंभर नगरसेवक असलेल्या पुणे शहरात भाजपला हक्काचे ऑफिस उभारता आले नाही.मालकीचे ऑफिस सोडा; भाडेतत्त्वावर घेतलेले ऑफिसही भाजप नेत्यांना आता सोडावे लागणार आहे.

जंगली महाराज रोडवरच्या हॉटेल सन्मानमधून महापालिकेच्या परिसरात हलले. भाजपचे (BJP) ऑफिस जेमतेम तीन वर्षांतच बंद होणार आहे. प्रचंड गर्दी जमवून तीन वर्षांआधी दिमाखात उघडलेल्या या ऑफिसचे जागामालक मुदत वाढवून द्यायला राजी होत नसल्याने भाजपवर आता नव्या जागेत ऑफिस थाटण्याची वेळ आली आहे. परिणामी, लोकसभा निवडणुकांची चर्चा वाढत असतानाच, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश भाजपमधील पुण्याचा चेहरा ठरलेल्या मुरलीधर मोहोळांवर पक्षासाठी जागा शोधावी लागली आहे.

अर्थात, घाटे- मोहोळांवर (Murlidhar Mohol) कोणी ऑफिस देता का, ऑफिस ? असे म्हणण्याची वेळ आली असावीच. मात्र, हे दोघेही आता ऑफिस सोडावे लागत आहे का, या प्रश्‍नाकडे सोयीने काणाडोळा करत असल्याचे जाणवले आहे. उलटपक्षी भाजपला विस्तारला आणि तो आणखी वाढणार आहे; नवे आणि प्रशस्त ऑफिस हवे, असे सांगण्यात धन्यता मानत आहेत. पण, घाटे, मोहोळांना पुढच्या निवडणुकांआधी ऑफिस मिळावावेच लागणार, हे निश्‍चित आहे.

दुसरीकडे,सध्याचे ऑफिस सोडावे लागणार असल्याने मोहोळ, घाटेंनी पक्षासाठी म्हात्रे पुलालगतच्या विकास आराखड्यातील (डीपी रस्त्यावर) नवी जागा ठरवली आहे. या परिसरात सुमारे तीन हजार चौरस फुटांत भाजपचे नवे ऑफिस होईल. विशेष म्हणजे, याच भागांत मोहोळ, घाटेंच्या प्रयत्नातून पक्षासाठी मालकीची जागा घेतली जाणार आहे. तीही तब्बल सात गुंठे जागा असून, या जागेत भव्य ऑफिस थाटण्याचा या दोघांचा प्लॅन आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे शहरात सध्या काँग्रेस पक्षाच्या मालकी हक्काचे मोठे ऑफिस आहे. शिवसेना ठाकरे गटाचेही मालकी हक्काचे ऑफिस आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, मनसे आणि शिवसेना शिंदे गटाचे ऑफिसेस भाडेतत्त्वावर घेतलेली आहेत. पुण्यासह दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचे वर्चस्व आहे. गेल्या दहा वर्षांत पुण्यात भाजपचे खासदार, आधी 8 आमदार, त्यानंतरच्या निवडणुकीत सहा आमदार राहिले, त्यात महापालिकेत शंभर नगरसेवकांना घेऊन भाजपने पाच वर्षे सत्ता राखली. (Pune BJP Office)

याच सत्तेतून महापालिकेच्या पुढच्या निवडणुकीतही पुन्हा सत्ताधीश होण्याची भाजपची व्यूहरचना आहे. त्याशिवाय, पुणे लोकसभा आणि पुण्यातील सहा आणि परिसरातील दोन अशा ८ विधानसभा मतदारसंघात पुन्हा आमदार निवडून आणण्याचा भाजप नेतृत्वाचा मेगाप्लॅन आहे. त्यासाठी भाजपची सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. अशातच पुढच्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू होण्याची चिन्हे आहेत.

राजकीय गडबड सुरू होण्याच्या काळातच भाजपच्या ऑफिसची मुदत संपली आहे. त्यातही काही वरिष्ठ नेत्यांनी विनवणी करूनही जागामालक मुदतवाढ देण्यास तयार नसल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे शहराचे नेतृत्व करणारे घाटे आणि पश्‍चिम महाराष्ट्र पक्ष वाढीची जबाबदारी असलेल्या मोहोळांना पुढच्या महिना-सव्वामहिन्यात आपला मुक्काम नव्या ऑफिससध्ये हलवा लागणार आहे. तसे नियोजनही या दोघांनी केल्याचे दिसत आहे.

जुन्या जागेत पार्किंगची सोय नव्हती आणि आता मोठी जागा हवी असल्याने नवे ऑफिस सुरू करणार असल्याचे घाटेंनी सांगितले. तर पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्राचा विचार करून ऑफिस उभारणीचा विचार झाला आहे. तेही पक्षाच्या मालकीचे असेन. त्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, तात्पुरते एक ऑफिस करणार आहोत, असे ‘स्मार्ट’ उत्तर मोहोळांनी देऊन टाकले. पण, राजकारणातील ‘महाशक्ती’ ठरलेल्या भाजपकडे खरोखरीच मालकीचे ऑफिस असायलाच हवे. मात्र, लोकसभा निवडणुकीआधी ते होणार का, याकडे बारीक लक्ष राहणार आहे. (भाजपकडील संपत्तीचा आकडा -असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या संकेतस्थळावर आहे.)

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT