Complaint of Pune BJP office Bearer: अजित पवारांकडून माझ्या जीवाला धोका; पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याची तक्रार; काय आहे प्रकरण?

Ajit Pawar News : भाजप पदाधिकारी रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप करत पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

भाजप पदाधिकारी रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. साळगावकर पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपचे अध्यक्ष आहेत. गणेशखिंड रस्त्यावर असलेल्या एका प्लॉटसंदर्भात ही तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी अर्ज स्वीकारला असून तपास सुरु करण्यात आला आहे.

Ajit Pawar
Case On Vikhe-Patil's Factory: राधाकृष्ण विखे-पाटील अडचणीत: न्यायालयाचे विखे कारखान्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

रवींद्र साळगावकर त्यांनी त्यांच्या लेटर हेडवर अजित पवार(Ajit Pawar) यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यात अजित पवारांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी पवारांच्या चौकशीची मागणी मागणी केली आहे. आता या गंभीर आरोपावर अजितदादा काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

काय आहे प्रकरण?

साळगावकर यांच्याकडे गणेश खिंड परिसरातील मोकळ्या प्लॉटचा ताबा आहे. तसेच या प्लॉटची मोजणी न करण्याचे आदेश न्यायालयाचे दिले आहे. तरीदेखील या प्लॉटची मोजणी करण्यात येत होती. याचवेळी साळगावकर यांना सातत्यानं धमकी दिली जात होती.

Ajit Pawar
Amit Shah News : अमित शाह यांनी चंद्रकांतदादांचे कान टोचले ; 'त्या' विधानावर नाराजी, शेलारांना फोन..

याबाबत पुणे शहर तहसील कार्यालयातही या प्लॉटच्या संदर्भात अजित पवार यांच्या नावाची चिठ्ठी लावल्याचं साळगावकर यांनी म्हटलं आहे. तसेच तहसील कार्यालयातून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्यामुळे साळगावकर यांनी अखेर अजित पवारांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com