Pune News : कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या करणाम्याची यादी रोज वाढत चालली आहे. कोथरूडमध्ये घायवळ टोळीच्या गुंडानी गोळीबार केल्यापासून आता रोज नवनवे महाप्रताप समोर येत आहे. हा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे.
पुणे आणि अहिल्यानगर येथे असलेले मतदान ओळखपत्र असो अथवा नावात फेरफार करून तातडीने मिळवलेला पासपोर्ट असो निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) हे नक्की कोणाच्या आशीर्वादाने करतोय यावरून आरोप-प्रत्यारोप होत असून अनेक राजकीय नेते अडचणीत आले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी तर थेट या प्रकरणात भाजपचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांचं नाव घेतलं आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे घायवळ सोबतचे कनेक्शन असल्याच जाहीरच सांगितलं होत.
त्यानंतर भारतीय जनता पार्टी कडून शनिवारी (ता.11) अधिकृत पत्रकार परिषद घेत निलेश घायवळ याला पासपोर्ट मिळताना कोणा कोणाचा सहभाग होता याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच हा पासपोर्ट महाविकास आघाडी सरकारच्या काळात मिळाला असल्याचे सांगत स्थानिक आमदार रोहित पवार यांनी तर पोलिसांवर दबाव आणला नाही ना ? असा सवाल केला आहे.
त्यानंतर आता याला आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा एक व्हिडिओ दाखवत पवार यांनी घायवळ बंधूंच्या जवळीकी बाबत आरोप केला.
रोहित पवार म्हणाले, सिद्धार्थ शिरोळे यांना अभ्यासू आमदार म्हणून ओळखले जाते, परंतु त्यांनी नेत्यांनी पाठवलेला कागद वाचत पत्रकार परिषद घेतली. त्याच्या अभ्यासाच्या अभावामुळे त्यांना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देता आली नाहीत.
रोहित पवार म्हणाले, "गुंडाच्या समर्थनात भाजपा मैदानात आहे." निलेश घायवळसारख्या गुन्हेगारांना भाजपचा पाठिंबा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात असे प्रकरण घडले असते, तर भाजप नेते आक्रमक झाले असते, पण आता ते शांत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ:
रोहित पवारांनी फडणवीस यांचा एक व्हिडिओ दाखवला, ज्यात कर्जत-जामखेड मतदारसंघातील राम शिंदे यांच्या प्रचार सभेत फडणवीस यांनी सचिन घायवळ (निलेशचा भाऊ) यांचे नाव घेतले होते. त्या सभेत सचिन घायवळ मंचावर उपस्थित होते. असा आरोप त्यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.