
मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदाचा दावा अद्याप सोडलेला नाही, त्यामुळे त्यांची मंत्रालयातील उपस्थिती कमी असल्याचे आरोप होत आहेत.
त्यांचा मुख्य फोकस रायगड जिल्ह्यात असून, ते नियमितपणे तिथेच कार्यरत असतात.
आता खरडून गेलेल्या जमिनी पिकाखाली आणण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली असून, त्यांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.
Raigad News : राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सुरु असलेल्या रायगडच्या पालकमंत्री वादावर अद्याप तोडगा निघालेला नाही. पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावे यासाठी स्वतः आदिती तटकरे आणि त्यांचे वडील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे फिल्डिंग लावून आहेत. पण मंत्री भरत गोगावले यांनीही मॅच सोडलेली नाही. शिवसेनेचे आमदार जास्त असल्याचा दावा करत भरत गोगावलेही पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत.
या आग्रहाचाचे रूपांतर गेल्या काही दिवसांपासून वादात झाले आहे. याचा फटका महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या वादामुळेच भरत गोगावले मंत्रालय किंवा त्यांच्या खात्यांमध्ये फारसे सक्रिय नसतात. त्यांचा मुक्काम नियमितपणे रायगड जिल्ह्यात असतो. फक्त मंत्रिमंडळ बैठकीला येतात असे आरोप गोगावले यांच्यावर होत असतो.
शिंदे सरकारमध्ये कोट शिवून ठेवलेले गोगावले मंत्रिपदासाठी अक्षरशः उतावळे झाले होते. आता फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले देखील. रोजगार हमी योजना खाते असून फलोत्पादन, खारभूमी विकास असे त्यांना देण्यात आले. पण ते त्यांच्याकडील खात्यांच्या कामात मागे पडल्याचे दिसत आहेत.
कदाचित या विभागांकडे किंवा या विभागातील विविध योजनांसाठी गोगावले यांना फारसा रस नसल्याचेच दिसून येत आहे. कारण या योजनांचे करायचे काय असाच बहुधा त्यांना पडलेला प्रश्न असावा. काहीच दिवसांपूर्वी गोगावलेंनी अचानक त्यांचा खासगी सचिवही बदलला. हे सचिव कार्यालय प्रमुख असतात. मात्र, या प्रमुखांनाच बदलल्याने चर्चेला उधाण आले होते.
पण आता गोगावले यांच्या खात्याला काम मिळाले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे राज्यातील लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. शेत जमिनी वाहून गेल्या. यामुळे आता शेती करायची कशी असा सवाल शेतकऱ्यासमोर उभा आहे. या चिंतेच्या वेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याची संधी गोगावले यांना मिळाली आहे.
सध्या नुकसानग्रस्त पिकांखालील जमिनी शाबूत आहेत पण खरडून गेलेल्या जमिनी पुन्हा पिकाखाली आणणे हे मोठे आव्हान आहे. याच जमिनी लागवडीयोग्य करण्याची जबाबदारी या विभागाकडे देण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपये प्रति दोन हेक्टर देण्याबरोबरच खचलेल्या, गाळाने भरलेल्या जमिनींसाठी 30 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. आता ही जबाबदारी गोगावले कशी पार पाडतात, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंत्रालयात ठाण मांडून बसतात का? मिळालेल्या संधीचे सोने करतात का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
प्र.1: भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदाचा दावा का सोडलेला नाही?
👉 त्यांना रायगड जिल्ह्याचे राजकीय आणि प्रशासनिक नेतृत्व करायचे असल्याने ते पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत.
प्र.2: मंत्रालयातील त्यांच्या अनुपस्थितीबद्दल काय आरोप आहेत?
👉 आरोप आहे की ते मंत्रालयात कमी वेळ देतात आणि फक्त मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहतात.
प्र.3: त्यांच्याकडे कोणती नवीन जबाबदारी देण्यात आली आहे?
👉 खरडून गेलेल्या जमिनी पुन्हा पिकाखाली आणण्याची आणि त्या लागवडीयोग्य करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्र.4: ही जबाबदारी कोणत्या विभागाशी संबंधित आहे?
👉 ही जबाबदारी कृषी व भूमी सुधारणा विभागाशी संबंधित आहे.
प्र.5: या जबाबदारीनंतर गोगावले यांच्या कामगिरीकडे का लक्ष लागले आहे?
👉 कारण या प्रकल्पाच्या यशावर त्यांची प्रतिमा आणि भविष्यातील राजकीय स्थान अवलंबून राहील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.