Om Rajenimbalkar : निष्ठावंत राहिले, खासदारकीला लीड वाढलं, 'फिल्ड'ही गाजवलं...; आता उद्धव ठाकरे ओमराजेंना मोठी जबाबदारी देणार?

Uddhav Thackeray Decision : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकरांसारख्या आक्रमक, अभ्यासू , मतदारांच्या प्रश्नांची जाण असलेला, अनुभवी युवानेतृत्वाची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नितांत आवश्यकता आहे.
Uddhav thackeray, Omraje Nimbalkar
Uddhav thackeray, Omraje Nimbalkar Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News: शिवसेना पक्षाचा मूळ स्वभाव आक्रमकता आणि ग्राऊंडवर उतरुन तळमळीने विषय मार्गी लावणे हाच असल्याचं इतिहासातून पाहायला मिळालं आहे. याच थेट भिडण्याच्या वृत्तीनं बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही इतर राजकीय पक्षांपेक्षा लोकांना वेगळी आणि तितकीच जवळची वाटली. पण नंतर हळूहळू आणि त्यातही शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ही शिवसेनेची ओळख झपाट्यानं पुसली गेली आणि एकमेकांवर टीका-टिप्पणी, उणीदुणी काढण्यात वा मीडियासमोर येऊन 'चमकोगिरी' करण्यातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना मोठेपणा आणि आपली खरी ओळख वाटू लागली.

पण, याचदरम्यान, सध्या राजकारणाची पातळी घसरलेली असतानाच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यात उतरत बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित शिवसैनिक आणि लोकनेता कसा असावा याचा आदर्श घालून दिला.

गेल्या महिन्यात महाराष्ट्राला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला. या तडाख्यात सर्वाधिक फटका हा कित्येक वर्ष दुष्काळाच्या झळा सोसलेल्या मराठवाड्यालाच बसला. मुसळधार पावसानं मराठवाड्यातील बीड,धाराशिव,सोलापूर,लातूर या काही जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली.

यापुराच्या पाण्यात शेतीच्या पिकांचं नुकसान तर झालंच,शिवाय अनेक कुटुंबांचा संसार वाहून गेला. घरात प्रचंड पाणी शिरलं. पण या आपत्कालीन प्रसंगात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, आपल्या मतदारसंघातील नागरिकांना तुमच्याच कुटुंबातला एक समजून हक्कानं मतांचा जोगवा मागत महाराष्ट्रातल्या दुसर्‍या क्रमाकांचे मताधिक्य घेत धाराशिवमधून निवडून आलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते ओमराजे निंबाळकरांचं नाव संपूर्ण राज्यात चर्चेत आलं.

धाराशिव जिल्हयातील परंडा तालुक्यातील वडनेर येथे अतिवृष्टीमुळे पूर आला होता.या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी व 2 वर्षाचा मुलगा व इतर 2 व्यक्ती रात्रीपासून अडकले होते.पूर्ण पाण्याने वेढलेल्या त्यांच्या घरावर अन्न व पाण्यविना मदतीची वाट पाहत होते.शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एनडीआरएफचे जवान आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका केली. यावेळी त्यांनी क्षणोक्षणी वेगानं पुराच्या पाण्याची पातळी वाढत असताना स्वत:चा जीव धोक्यात घालून एक कुटुंबाचा जीव वाचवला.

Uddhav thackeray, Omraje Nimbalkar
Pune Politics : भाजपचा काँग्रेसला धक्का, पाच माजी नगरसेवक फुटणार? देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात पाऊल ठेवताच टार्गेट 125 ची चर्चा!

या त्यांच्या बचाव कार्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.तेथील पूरपरिस्थतीची दखल घेत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी ही पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मराठवाड्याकडे धावले. आपला लोकप्रतिनिधी हा ओमराजेंसारखा असावा अशी चर्चा नागरिकांमध्ये झडू लागली.त्यांनी वडिलांच्या हत्येनंतर सर्वसामान्य नागरिकांशी असलेली नाळ दिवसेंदिवस वाढतच नेली. लोकांच्या सुख दु:खात जाणं असो किंवा साध्यातल्या साध्या प्रॉब्लेमसाठीही मतदारसंघातील नागरिकांनी हक्कानं फोन करण्याइतपत मतदार आणि लोकप्रतिनिधी हे नातं आजच्या प्रोफेशनल काळात जवळपास दुरापास्तच झालं आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही पूरपाहणीच्या दौऱ्यावेळी ओमराजेंच्या कार्याची दखल घेत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. पण ओमराजें निंबाळकरांसारखा (Omraje Nimbalkar) खासदार किंवा नेता पक्षात असताना त्यांना बळ देत राहणं,नवनवीन संघटनात्मक कामाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करुन देणंही तितकंच गरजेचं आहे.

Uddhav thackeray, Omraje Nimbalkar
Sangram Jagtap notice : संग्राम जगतापांचं हिंदुत्वाचं प्रेम का वाढलं? अजितदादांच्या नोटिशीचा काय परिणाम होणार? पक्षानं भूमिका घेतल्यास आमदारकीचं कसं?

उद्धव ठाकरेंनी इतर संघटना आणि पक्षातून शिवसेनेत दाखल झालेल्या नवख्या आणि बोलबच्चनगिरी करणार्‍या नेत्यांना पदं दिली,वेगवेगळ्या जबाबदार्‍या दिल्या. पण आता मोदी लाटेत सलग दोन निवडणुका लाखोंच्या मताधिक्क्यांनी निवडून आलेल्या आणि संकटकाळात उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभे राहिलेल्या ओमराजेंना आता संघटनात्मक पातळीवर काम करण्यासाठी मोठी जबाबदारी देण्याची आवश्यकता आहे. ओमराजेंनी आपल्या नेतृत्वाची आणि कार्यक्षमतेची चुणुक दाखवून दिली आहे.पण तरीही ते संघटनेत

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे ग्राऊंड लेव्हलला उतरुन काम करणाऱ्यांपेक्षा मीडियासमोर किंवा मिळेल त्या माध्यमातून चमकोगिरी करणाऱ्या नेतेमंडळींची संख्या जास्तच आहे. पक्ष अडचणीत असताना किंवा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच ठाकरेंची शिवसेना आणि नेतेमंडळी हे टीका-टिप्पणी किंवा आरोपांना उत्तर देण्यातच गुंतलेले दिसन येत आहे.

Uddhav thackeray, Omraje Nimbalkar
Shivsena- BJP News : सत्तेत एकत्र पण मनं जुळलीच नाही; स्थानिकसाठी भाजपाचा स्वबळाचा नारा, शिवसेनेला मात्र हवी युती!

संघटनात्मक पातळीवर बदल किंवा मेळावे,बैठका,दौरे,भेटीगाठी यांचे वारे अजून वाहताना वाहताना दिसून नाही. अशा परिस्थितीत ओमराजेंसारखा कार्यतत्पर आणि सध्या सोशल मीडियांसह जनमानसांतही प्रचंड चर्चा असलेल्या 'लोकनेत्या'कडे ठाकरेंनी एखादी संघटनात्मक पातळीवर मोठ्या पदाची जबाबदारी दिली,तर शिवसैनिकांमध्ये पुन्हा उत्साह संचारण्याची शक्यता आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकरांसारख्या आक्रमक,अभ्यासू आणि,मतदारांबद्दल प्रश्नांची जाण असलेला, संसद गाजवलेल्या, अनुभवी युवा नेतृत्वाची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नितांत आवश्यकता आहे. याचा फायदा शिवसेनेला आगामी मराठवाड्यातील महापालिका,जिल्हा परिषद,पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये नक्कीच होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com