Rahul Solapurkar Controversial statement about Dr. Babasaheb Ambedkar: अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानानंतर सबंध महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितली. तरीदेखील राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवप्रेमींकडून होत असतानाच आता राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेलं विधानही वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे
राहुल सोलापूरकर(Rahul Solapurkar) यांनी एका मुलाखती दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वेदानुसार ब्राह्मण ठरतात असं विधान केलं आहे. त्याबाबतचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे आंबेडकरी संघटना अधिकच आक्रमक झाल्या असून राहुल सोलापूरकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायावरती नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. असा देखील इशारा दिला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सचिन खरात म्हणाले, मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखती दरम्यान बोलताना म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं, आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राह्मण ठरतात हे विधान अत्यंत निषेधार्थ विधान केलं आहे, परंतु राहुल सोलापूरकर यांना मी सांगू इच्छितो की जे वेद आहेत त्याच्याबद्दल डॉ बाबासाहेबांनी लिहिलेले आहे आणि डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला राहुल सोलापूरकर यांनी काहीही शिकवू नये.
राज्य सरकारने तत्काळ सोलापूरकर यांच्यावर कारवाई सरकारने करावी, आणि राहुल सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा आम्ही देत आहोत.
यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले, छत्रपती शिवरायांबाबत गरळ ओकल्यामुळं आठ दिवसांपूर्वीच माफी मागण्याची वेळ आलेला राहुल सोलापूरकर आता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बरळला. सरकारने एकतर याच्यावर येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार करावेत आणि हा मेंटल नसेल तर याच्यावर गुन्हा दाखल करुन शेजारीच असलेल्या येरवडा जेलची निवांत हवा खायला पाठवून द्यावं. यावेळी तरी याचा लाड करु नये..! असा इशारा सरकारला दिला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.