Solapurkar controversial statement : राहुल सोलापूरकरांचे आणखी एक वाद्‌ग्रस्त विधान व्हायरल; डॉ. आंबेडकरांचे अनुयायी आक्रमक!

Babasaheb Ambedkar Followers Aggressive : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राच्या सुटकेबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर संबंध महाराष्ट्रातून सोलापूरकर यांचा निषेध करण्यात आला. काही संघटनांनी आक्रमक होत थेट सोलापूरकर यांच्या घरावर चाल केली. त्यानंतर सोलापूरकरांनी त्याबाबत माफी मागितली आहे.
Rahul Solapurkar-Babasaheb Ambedkar
Rahul Solapurkar-Babasaheb Ambedkar Sarkarnama
Published on
Updated on

Pune, 09 February : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर संबंध महाराष्ट्रात असंतोष पाहायला मिळाला. राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरत असतानाच सोलापूरकर यांचं आणखी एक वादग्रस्त विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यानंतर आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या असून सोलापूरकर यांनी आंबेडकरांच्या पायावर नाक घासून माफी मागावी; अन्यथा त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राच्या सुटकेबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर संबंध महाराष्ट्रातून राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांचा निषेध करण्यात आला. काही संघटनांनी आक्रमक होत थेट सोलापूरकर यांच्या घरावर चाल केली. त्यानंतर सोलापूरकरांनी त्याबाबत माफी मागितली आहे. मात्र, सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, या मागणीवर शिवप्रेमी ठाम आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वाद्‌ग्रस्त विधान करणारे राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar ) हे वेदानुसार ब्राह्मण ठरतात, असं विधान केलं आहे. त्याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Rahul Solapurkar-Babasaheb Ambedkar
Barshi Politic's : सोलापुरातील कट्टर राजकीय विरोधकांचा एसटीतून एकत्र प्रवास; दावे मात्र वेगवेगळे!

सचिन खरात म्हणाले, मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राम्हण ठरतात, असे अत्यंत निषेधार्ह विधान केलं आहे. पण, राहुल सोलापूरकर यांना मी सांगू इच्छितो की, जे वेद आहेत, त्याच्याबद्दल डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले आहे आणि डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला राहुल सोलापूरकर यांनी काहीही शिकवू नये.

Rahul Solapurkar-Babasaheb Ambedkar
Manoj Jarange Patil : मेहुण्यावर तडीपारीची कारवाई होताच जरांगेंचा CM फडणवीसांना इशारा, म्हणाले, "तर मराठ्यांची पोरं..."

राज्य सरकारने राहुल सोलापूरकर यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. राहुल सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशाराही सचिन खरात यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com