Rupali Chakankar  Sarkarnama
पुणे

Rupali Chakanakar : रुपाली चाकणकरांच्या 'स्टेटस'ने राजकारण तापले! 'त्या' मंडळींवर साधला कवितेतून निशाणा...

Viral WhatsApp status News : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा त्यांच्या सोबतचा फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या टिकेला सामोरे जावे लागले.

सरकारनामा ब्युरो

Pune News : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा त्यांच्या सोबतचा फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे चाकणकरांना विरोधकांनी केलेल्या टिकेला सामोरे जावे लागले. या टीकेनंतर त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला. दुसरीकडे त्याच कारणातून राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पद देखील त्यांना सोडावे लागले होते. त्यातच त्यांना एसआयटी चौकशीलाही सामोरे जावे लागले होते. त्यामुळे गेल्या दोन महिन्याच्या काळात बॅकफूटवर गेल्या होत्या. त्यानंतर मात्र या प्रकारातून सावरत त्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून त्या चर्चेत आल्या असून त्यामधील फोटो अन् कवितेतून अनेकांना जोरदार टोला लगावला आहे.

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचा अलीकडेच व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्यांनी त्यांची बाजू प्रभावीपणे मांडत त्यांच्यावर केले जात असलेल्या चिखलफेकीला त्याच शब्दांत उत्तर दिले आहे. यामध्ये त्यांनी अशोक खरातशी कुठेही संबंध नसल्याचे सांगितले.

त्यासोबतच AI चा आणि खोट्या माहितीचा वापर करून त्यांना फसवण्यात आले. खरातसोबत कुठलेच आर्थिक व्यवहार केले नाहीत. त्याशिवाय जमिनीच्या व्यवहार प्रकरणी कोणतीच माहिती नसून मी पार्टनर नव्हतेच, असे चाकणकर म्हणाल्या आहेत.

त्यानंतर बुधवारपासून पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्यावर महिला आयोग सदस्या आशा मिरगे यांच्यासह अनेकांनी संधी साधून चिखलफेक केली. या सर्वांना नोटीस आली आहे. दिल्ली हायकोर्टात या सगळ्यांना उपस्थित राहावे लागणार आहे, तिथे मी देखील असेन, असे चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.

त्यासोबतच या प्रकरणानंतर आता चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी कवितेतून अनेकांना जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी त्यामध्ये म्हटले आहे की, ‘माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे, जळेल झोपडी माझी आग अशी ज्वलंत नाही’. सध्या त्यांच्या या स्टेटसची सर्वत्र चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT