Rupali Chakankar News Sarkarnama
पुणे

NCP News: चाकणकरांना लवकरच दुसरा धक्का? सुनेत्रा पवारांवरचा दबाव वाढला, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या राजीनाम्यासाठी नेत्या एकवटल्या

Rupali Chakankar Resign Demand: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर त्यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडावं लागलं होतं.

Sudesh Mitkar

Pune News : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर त्यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडावं लागलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी एक मुखाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

याबाबत सुनेत्रा पवार यांना रुपाली चाकणकरांच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याकरिता मागणी करणारं पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्ह्यातील महिला जिल्हाध्यक्ष आणि भगूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष असलेल्या प्रेरणा बलकवडे त्यांच्यासह जिल्ह्यातील सर्व महिला तालुका अध्यक्षांचा समावेश आहे

काय म्हटलं पत्रात...?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिलांचा सन्मान आणि न्यायासाठी कटिबद्ध असलेला पक्ष आहे. याच मूल्यांवर विश्वास ठेवून आम्ही, नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रबादी महिला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या, पक्षाचे काम निष्ठेने करत आहोत. परंतु, आज पक्षाच्या अस्तित्वावर आणि तत्त्वांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, आणि त्याच तीव्र वेदनेतून आम्ही हे आवाहन करत आहोत.

अशोक खरात यांच्याकडून अनेक महिला आणि तरुण मुलींचा छळ आल्याच्या भयानक प्रकरणात पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा थेट संपर्क असल्याचे उघड झाले आहे. ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. की, अनेक वर्षांपासून महिलांचा छळ करणाऱ्या व्यक्तीचे त्या समर्थन करत आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात पक्षाच्या प्रतिमेचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.

ही त्यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी हगवणे प्रकरण व इतर प्रकरणात देखील त्यांचा निष्काळजी कार्यामुळे पक्षाचे नाव खराब झाले आहे. त्यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचावर कारवाई करायची व निवडणुकीनंतर महिला प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा त्यांनी अनेक वेळी केली होती. पक्षाला प्रत्येकवेळी या संवेदनशील प्रकरणांची माहिती असूनही त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई कधी झाली नाही आणि त्याच दुर्लक्षामुळे आज पक्षावर ही गंभीर वेळ ओढवली आहे.

आज पक्षाची प्रतिमा समाजात डागाळली आहे. आपल्या महिला प्रदेशाध्यक्षांचे नाव प्रकरणात जोडल्याने व महिलांचा छळ करणाऱ्यांचे समर्थन करतात, त्या महिला नेतृत्वाखाली आम्ही तळागाळातील महिला कार्यकर्त्या काम करू शकत नाही. आज ग्रामीण भागात आम्ही महिला त्यांचासोबत काम केले तर लोकांमध्ये आमच्याविषयी चुकिची छवी निर्माण होईल. लोकांमध्ये जाऊन पक्षाच्या तत्त्वांविषयी बोलणे आम्हाला अशक्य होणार आहे.

त्यामुळे, आम्ही, नाशिक जिल्ह्यातील सर्व कार्यकारणी सदस्य, तालुका अध्यक्ष आणि कार्यकर्ते, आपणास एकमताने आणि अत्यंत गंभीरपणे हे कळवत आहोत की, जर रुपाली चाकणकर यांना तात्काळ पदावरून हटवले नाही, तर आम्ही सर्व जण आमची कर्तव्ये पार पाडू शकणार नाही.

महाराष्ट्रातील जनतेमध्ये पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी आणि पक्षाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी, आम्ही आपणास विनंती करत आहोत की, रुपाली चाकणकर यांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून आणि इतर सर्व पदांवरून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे.आपण यावर त्वरित कारवाई करून पक्षाची होणारी अपरिमित हानी टाळान, हीच शेवटची आशा आहे. असे पत्रात म्हटले आहे.

पत्रामध्ये कोणाकोणाचे नावे

सायरा अब्दुल शेख (देवळाली) उपाध्यक्ष,

कल्पना नंदू शिरसाठ (चांदवड)

उपाध्यक्ष

वैशाली भगवान जाधव (मालेगाव)

सरचिटणीस

ज्योती मावकार वाकचौरे (नाशिक)

सरचिटणीस

जयधी अनिल केदार (सिन्नर)

सरचिटणीस

वर्षा तुपार लिंगायत (नाशिक)

चिटणीस

मंगल उमेश नागरे (चांदवड)

चिटणीस

चंद्रकला बळवंत बुरडे (दिंडोरी)

चिटणीस

मंजुषा राजेंद्र महेश (भगूर)

सचिव संघटक

प्रतीक्षा प्रसाद खात्री (सिन्नर)

सचिव संघटक

पद्मा कैलास पवार (त्र्यंबकेश्वर)

जिल्हा सदस्य

आरती विठ्ठल भोंडवे (इगतपुरी)

जिल्हा सचिव

शितल साहेबराव भोर

नाशिक तालुकाध्यक्ष

प्रेमलता राजू राजगुरू

भगूर शहराध्यक्ष

सपना अनिल पगार

कळवण तालुकाध्यक्ष

अनिता शिवा काळे

इगतपुरी तालुकाध्यक्ष

सुरेखा अशोक नागरे

राजश्री प्रविण पहिलवान

येवला तालुकाध्यक्ष

आशा सुनील थोरात

येवला शहराध्यक्ष

आशा हरिभाऊ देवरे

इगतपुरी शहराध्यक्ष

भारती प्रभाकर बिरारी

चांदवड तालुकाध्यक्ष

प्रतिभा प्रदिप खैरणार

त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष

तृप्ती उदय सोनवणे

अपर्णा राजेंद्र देशमुख

मालेगाव तालुकाध्यक्ष

मालेगाव तालुका कार्याध्यक्ष

बनिता संतोष शिंदे

नांदगाव तालुकाध्यक्ष

संगीता बामन राउत

देवळा तालुकाध्यक्ष

दिंडोरी तालुकाध्यक्ष

पूनम रामदाम गावळी

पेठ तालुका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT