Pune News : महाराष्ट्रात बारामती, धाराशिव, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले यांसह अकरा लोकसभा मतदारसंघात तिसर्या टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघातील लढतींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेले आहेत.
ही मतदान प्रक्रिया पार पडताना काही ठिकाणी गालबोट लागले. मतदान केंद्रावर बाचाबाची, ईव्हीएम मशीन जाळण्यापासून ते हत्येपर्यंत अशा अनेक घटनांनी आजचा दिवस गोंधळाचा ठरला. याचवेळी आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मंगळवारी मतदान सुरु असतानाच ईव्हीएमची पूजा केली होती. याचप्रकरणी आता चाकणकर यांच्याविरोधात पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आता त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी रुपाली चाकणकरांवर टीकेची झोड उठवली आहे.त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ज्या पद्धतीने ईव्हीएम मशीनची पूजा केली, त्यांचे अशा पद्धतीने वागणं हे वाड्यासारखे आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार केले पाहिजे असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सव्वालाखे म्हणाल्या, गेल्यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यालयातून पक्षाचा प्रचार केला होता. तेव्हा त्यांची कीव आली होती. त्यावेळी असे वाटलं होतं की, त्या असे कृत्य कुणाच्यातरी सांगण्यावरुन किंवा दडपणाखाली करत असतील. पण आजचं त्यांचं कृत्य म्हणजे खरंच त्यांच्या डोक्यात फरक पडल्याचं लक्षण असून ते पुरोगामी महाराष्ट्राला न शोभण्यासारखं आहे अशी टीका त्यांनी केली आहे.
याचवेळी संध्या सव्वालाखे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी रूपाली चाकणकर यांच्या कृत्याची तत्काळ दखल घेत त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली आहे. तसेच नाहीतर भविष्यात आयोगाकडे एखादी महिला दाद मागण्यासाठी गेल्यास तिला न्याय मिळणार नाही असेही त्या म्हणाल्या आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.