Loksabha Election 2024 : लोकसभेच्या लातूर मतदारसंघासाठी मंगळवारी उत्साहात मतदान पार पडले. उन्हाचा पारा वाढलेला असला तरी मतदारांमधील उत्साह कमी नव्हता. गेली दोन आठवडे जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले होते. महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे विरुद्ध महाविकास आघाडीचे डाॅ. शिवाजी काळगे यांच्यात अटीतटीची लढत झाल्याचा निष्कर्ष आजच्या मतदानानंतर काढला जात आहे.
महाविकास आघाडीच्या संपूर्ण प्रचाराची धुरा सांभाळणारे माजी मंत्री आमदार अमित देशमुख(Amit Deshmukh) यांनी मात्र आपण नक्की जिंकू, असा विश्वास व्यक्त करतानाच मतदारांचे आभार मानले आहेत. प्रिय मतदार बंधू-भगिणींनो गेले काही दिवस आपण डाॅ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी अहोरात्र राबलात.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संपुर्ण ताकदीने प्रचारात उतरलेले महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच या काळात महाविकास आघाडीला पाठबळ देणारे अनेक सहकारी, हितचिंतक, मित्र व ज्ञात-अज्ञात पाठीराख्यांचे मी ऋण व्यक्त करतो.
लोकशाही वाचविण्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. याबद्दल मतदारसंघातील प्रत्येकाचे मनापासून आभार. मतदान करून आपण आपले कर्तव्य बजावले. आपल्या सर्वांच्या साथीने आपण ही लढाई जिंकू, अशा शब्दात अमित देशमुख यांनी मतदार तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार मानले.
मतदारांमधील उत्साह परिवर्तनाची नांदी असल्याचा दावा, महाविकास आघाडीकडून केला जातोय. काळगे यांच्या प्रचारासाठी अमित देशमुख यांच्यासह त्यांचे अख्खे कुटुंब प्रचारात उतरले होते. सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेतल्यानंतर महाविकास आघाडीला(Mahavikas Aaghadi) विजयाची खात्री वाटू लागली आहे.
भाजप महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी शेवटच्या टप्प्यात आघाडी घेत महाविकास आघाडीला जोरदार टक्कर दिली. मतदारांनी आपला कौल मतपेटीत बंद केला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा केला जातोय.
(Edited by - Mayur Ratnaparkhe )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.