Pune News : निवडणुका आल्या की काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आणि हेवेदाव्यांच्या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात. विविध गट सक्रिय होऊन काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह पाहायला मिळतो. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर आता काँग्रेसच्या जेष्ठ महिला नेत्या संगीता तिवारी नाराज असल्याचं समोर आले आहे. त्यांनी आपली नाराजी व्हाट्सअप संदेशाच्या माध्यमातून बोलून दाखवली आहे.
मागील दोन लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) भाजपाकडून काँग्रेसला मोठा पराभवाचा धक्का पचवावा लागला आहे. दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. एकीकडे भाजपने पुण्याला आपला गड बनवला असताना काँग्रेस (Congress) ची मात्र शहरात पीछेहाट सुरू आहे. अशातच काँग्रेसमधील गटबाजी अशीच कायम राहिली तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ती घातक ठरू शकते.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधले रुसवेफुगवे दूर करण्यासाठी पुढाकार घेत आजी-माजी पदाधिकारी, ज्येष्ठ, युवा नेत्यांचे मनोमिलन घडवून आणण्यासाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून गटबाची शमवण्याचा प्रयत्न केला. मात्र ही गटबाजी रोखण्यात खुद्द प्रदेशाध्यक्षांना देखील अपयश आल्याचे पाहायला मिळाले. आता पुढील काही दिवसात काँग्रेसकडून लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्यात येणार असताना गटबाजीने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल (Aba Bagul) यांनी नुकतेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवून जाहीर सभा घेऊन नंतरच लोकसभेचा उमेदवार ठरवावा, अशी मागणी केली. या धक्क्यामधून काँग्रेस सावरतो ना सावरतो तोच महिला नेत्या संगीता तिवारी (Sangita Tiwari) स्थानिक नेत्यांच्या कारभारावरती नाराज असल्याचा प्रकार समोर आला आहे. सातत्याने आपल्याला डावलले जात असल्याचा संदेश व्हाट्सअपद्वारे पाठवून आपण पुढील काही दिवस राजकारणापासून दूर राहणार असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये काँग्रेसमधील ही नाराजी किती घातक ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.