Sharad Mohol Case Sarkarnama
पुणे

Sharad Mohol Case: सिनेस्टाईल थरार ! शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड गणेश मारणेच्या मुसक्या आवळल्या

Ganesh Thombare

Pune News: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी गणेश मारणे हा पळून जाण्याच्या तयारीत असतानाच संगमनेरमध्ये पोलिसांनी थरारक पाठलाग करत बेड्या ठोकल्या आहेत. (Sharad Mohol Case News)

शरद मोहोळ हत्या प्रकरणात गणेश मारणे हा मुख्य आरोपी आहे. मागील अनेक दिवसांपासून तो फरार होता. कुख्यात गुंड शरद मोहोळची काही दिवसांपूर्वी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात हत्या झाली होती. या प्रकरणात जवळपास 15 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, मुख्य सुत्रधार गणेश मारणे हा फरार होता. अखेर बुधवारी पुणे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या गणेश मारणे याने वकिलांमार्फत अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, गणेश मारणेचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर पोलिसांनी गणेश मारणेचा शोध घेत मोठी कारवाई केली.

पाठलाग करत ठोकल्या बेड्या

आरोपी गणेश मारणेचा मागील काही दिवसांपासून पोलिस शोध घेत होते. मात्र, तो फरार होता. यानंतर बुधवारी आरोपी गणेश मारणे हा संगमनेर परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने चक्र फिरवले. पोलिस आल्याची कुणकुण लागताच आरोपीने पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT