Sharad Mohol Case Update : शरद मोहोळ खून प्रकरणात नवा ट्विस्ट; तपासात पोलिसांकडून 'प्लँचेट'चा वापर?

Pune Police Planchet News : यापूर्वी पुणे पोलिसांकडून ‘प्लँचेट’ वापर...
Sharad Mohol Case Update :
Sharad Mohol Case Update : Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आरोपींच्या अटकेनंतर आता त्यांचा बचाव करणारे वकील यांनी खळबळजनक दावा केला आहे. 'पोलिस आरोपींची कोठडी मागतात. त्यानंतर वेगळ्याच गोष्टी तपासात उघड होतात. पोलिस ‘प्लँचेट’ (जादूटोणा) करतात,' असा आरोप बचाव पक्षाचे वकील ॲड. केतन कदम यांनी युक्तिवादात केला. यामुळे पोलिस ‘प्लँचेट’ करतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

Sharad Mohol Case Update :
Sharad Mohol Case Update : गुंड शरद मोहोळ खूनप्रकरणी आणखी दोघांना अटक; पिस्तूल कोणी पुरवलं?

बचाव पक्षाच्या वकिलांनी हा दावा केला असला, तरी पोलिसांना याबाबतीत विचारले असता त्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. मोहोळ खून प्रकरणात पोलिसांनी ‘प्लँचेट’चा वापर केला नाही. बचाव पक्षाच्या वकिलांनी जे आरोप पोलिसांवर केले आहेत, त्यासंबंधित आरोपांची न्यायालयाने नोंद करून घ्यावी, असे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले. बचाव पक्षाच्या वकिलांनी केलेले आरोप सरकारी वकील ॲड. नीलिमा इथापे-यादव यांनी फेटाळून लावले.

यापूर्वी पोलिसांकडून ‘प्लँचेट’ वापर -

अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणात तपास करताना तत्कालीन पुणे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी ‘प्लँचेट’ केल्याचे उघड झाले होते. पत्रकार आशिष खेतान यांनी यासंदर्भातले काही व्हिडीओ समाजमाध्यमात आणले होते. यामुळे २०१४ मध्ये याबाबत एकच खळबळ उडाली होती. ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अवघे आयुष्य समर्पित केले, त्यांच्या खुनाच्या तपासासाठी 'प्लँचेट’ केल्यामुळे पुणे पालिसांवर सर्व स्तरांतून टीका करण्यात आली होती.

Sharad Mohol Case Update :
Sharad Mohol Case Update : गुंड शरद मोहोळ खूनप्रकरणी आणखी दोघांना अटक; पिस्तूल कोणी पुरवलं?

आरोपी कोर्टात हजर -

खून प्रकरणातील आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. त्याला प्रतिवाद करताना बचाव पक्षाचे वकील केतन कदम यांनी सांगितले की, पुणे पोलिस गुन्ह्याच्या तपासात 'प्लॅन्चेटचा' वापर करतात, हे यापूर्वीच्या गुन्ह्यात दिसून आले आहे. या प्रकरणातील आरोपींकडून पोलिसांनी शस्त्रे जप्त केली आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com