Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : काहीही झाले तरी घाबरू नका, तुमच्या पाठीशी मी खंबीर उभा - शरद पवार

NCP Sharad Pawar Meeting : बूथ कमिटीच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी धमक्‍या येत असल्याबाबत केल्या होत्या तक्रारी.

पांडुरंग सरोदे :सरकारनामा

Baramati Political News : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मंगळवारी धीर दिला. "काही लोकांकडून कार्यकर्त्यांना दमदाटीचे, नोकरीवरून कमी करण्याचे फोन येत आहेत, धमक्‍या दिल्या जात आहेत, असे मला कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. पण काहीही झाले तरी, घाबरू नका, तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे.'' असं पवारांनी सांगितलं.

शरद पवार(Sharad Pawar) यांनी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने मतदारसंघाचा तालुकानिहाय आढावा घेतला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यातर्फे झालेल्या बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के, पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष नेमका कुठे कमी पडत आहे, मागील निवडणुकीमध्ये कुठे कमतरता राहून गेली होती, कार्यकर्त्यांनी घरोघरी मतदारांच्या भेटी घ्याव्यात, पक्षाच्या उमेदवारांची पत्रके, मतदारांच्या स्लीप प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचतील याची योग्य ती काळजी घ्यावी इत्यादी सूचना पवार यांनी करून उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

कार्यकर्त्यांनी मांडलेल्या व्यथांवर बोलताना पवार म्हणाले, 'कार्यकर्त्यांवर दबाव टाकला जात आहे, याची आम्ही गांभीर्याने नोंद घेतली आहे. आम्ही या प्रकरणाच्या खोलात जाणार आहोत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना जर कोणी धमकावत असेल, तर मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, हे लक्षात ठेवा.'

याशिवाय खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी, "आपल्या विरोधात कोण उमेदवार आहे, याचा विचार करू नका. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मागील 15 वर्षांपासून आपण काम करत आहोत. जनतेलाही आपण केलेल्या कामाची पूर्णपणे माहिती आहे. संसदेपासून मतदारसंघात केलेल्या प्रत्येक कामाचा जनता नक्कीच विचार करेल.' असं सांगत कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागण्याची सूचना केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT