Pune, 14 May : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या स्थानावरून राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर खुद्द पवार यांनीच प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचे राजकारणातील महत्व यावर भाष्य केले आहे.
माजी मंत्री प्रफुल पटेल (Praful Patel) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळले आहे, त्याबाबत पवार म्हणाले, मला त्या गोष्टीवर भाष्य करायचे काही कारण नाही. तो दुसरा पक्ष आहे, त्यांचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भवितव्यासाठी जनमाणसात सगळ्यात प्रभावी लोक आहेत, त्यांना त्यांच्या संघटनेच्या कार्यकारिणीत त्यांनी संधी दिलेली दिसते. तसेच पटेल यांचा प्रभाव कितपत आहे, याची शंका कुणाच्या मनात असेल तर ती त्यांना व्यक्त करायची होती का? हे मला माहिती नाही, असेही शरद पवारांनी (Sharad Pawar) नमूद केले.
पवार म्हणाले, पण मला हे माहिती आहे की, प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे आज आमच्याबरोबर नाहीत. अलीकडेही नव्हते. पण, गेली २५ ते ३० वर्षे प्रफुल पटेल हे पार्लमेंटमध्ये २००३ पासून माझ्याबरोबर होते. तटकरे हे रायगड जिल्ह्यात, राज्यात होते. तसेच, राज्याचे अर्थमंत्रीही आणि पक्षाचे राज्याचे अध्यक्षही होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय कर्तृत्व आहे, याचा कल्पना मला आहे. पण ते ज्या संघटनेत आहेत, त्याच्यामध्ये कुणाचा किती आणि कसा उपयोग करून घ्यायचा, याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या संघटनेच्या नेतृत्वाचा आहे.
राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या संपर्कात; पवारांचं हे उत्तर
आम्ही कुणाशी चर्चा केलेली नाही आणि माझ्याशी कोणी चर्चा केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे २२ आमदार भाजपच्या संपर्कात असतील, असं मला वाटत नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार
बारामती विधानसभा मतदारसंघातून २०२९ मध्ये पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता रोहित पवार यांनी बोलून दाखवली. त्यावर पवार यांनी ‘प्रत्येकाला आपलं मत आणि निर्णय घेण्याचा अधिकार आहे,’ असे सांगितले. तसेच, सगळ्यांनी कशी काळजी घ्यावी, या विषयावर आमच्यामध्ये (पवार कुटुंबीयांत) चर्चा झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्या गोष्टीला तुम्ही लोकांनी फार गांभीर्यानं घेतलं
सुनील तटकरे हे माझ्याकडे आले होते. ते गेली महिनाभर मला भेटीची वेळ मागत होते. पण, मला न्यूमोनिया झाला होता, त्यामुळे मी घराबाहेर पडत नव्हतो. मी त्यांना भेटीसाठी परवाची वेळ दिली होती, त्यानुसार ते आले आणि दहा मिनिटे चौकशी करून गेले. पण, या गोष्टीला तुम्ही लोकांनी अतिशय गांभीर्याने घेतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.