

Sharad Pawar speaks on Petrol-Diesel crisis: केंद्र सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतीच हजेरी लावली होती. त्यांच्या हजेरीमुळं आणि आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परकीय चलन बचतीच्या केलेल्या आवाहनामुळं देशातील परिस्थिती गंभीर असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानुसार शरद पवारांनीही आज खरंच अशी परिस्थिती असल्याचं सांगितलं. पण ही परिस्थिती असताना हे सांगायला इतका उशीर का केलात? असा खडा सवालही पवारांनी पंतप्रधानांना विचारला आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी देशभरात सुरु असलेल्या विविध विषयांवर सविस्तर भूमिका मांडली. विशेषतः सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीबाबत त्यांनी माहिती देत त्यावर आपली भूमिकाही स्पष्ट केली. पवार म्हणाले, हे खरंय की इराणचा जो काही इश्यू आहे त्याचा काही ना काही दुष्परिणाम हा आहे. पण तेवढाच आहे का? जर तेवढाच असेल तर मग हा निर्णय घ्यायला इतका उशीर का लावला? ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल लागून गेले, त्या दिवशीपासून हे सर्व निर्णय घेतले गेले. निवडणुकीची प्रक्रिया चालू होती त्या काळात हे गांभीर्य देशाच्या नेतृत्वाला आलं नाही. हे सर्व निवडणुकीच्या काळामध्ये कधीही या पद्धतीची जनतेमध्ये जागृती करावी हा विचार आला नाही.
उलट मी काल-परवाच बातमीत पाहत होतो की, सोमनाथाचं जे मंदिर आहे त्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रधानमंत्री तिथं गेले त्याबाबत तक्रारीच कारण नाही पण ते मंदिराजवळ बसले आणि तिथून एअरफोर्सची सहा विमानं त्या कार्यक्रमात सहभागी झालेली होती. म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती याबाबतच निवेदन करायच्या आदल्या दिवशी ६ विमानांनी त्यांची कसरत दाखवण्याचा प्रयत्न केला. मला एवढंच सांगायचं आहे की, प्रश्न, परिस्थिती गंभीर आहे तर हे गांभीर्य सगळ्या परिस्थितीत दाखवलं पाहिजे.
दरम्यान, याचा अर्थ एकच आहे की आपल्या रुपयाचं जे मुल्य आहे हे घसरु द्यायचं नाही हा याच्या मागचा हेतू आहे. पण हे फार चुकीचं आहे हे मी म्हणत नाही. पण एका बाजुला आपण हे म्हणायचं आणि दुसरीकडं खर्च कमी करायला इतर अनेक गोष्टी आहेत विशेषतः प्रशासनात याकडं दुर्लक्ष करायचं या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.