Nitin Gadkari Tour : गडकरींनीही वाहनांचा ताफा सोडला : बसने प्रवास करत केली पालखी मार्गाची पाहणी, पवारांचे आमदार, खासदारही सहभागी

Palkhi Marg Pahani : नितीन गडकरी यांनी वाहन ताफा टाळून बसने प्रवास करत पालखी मार्गाची पाहणी केली. मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिला.
Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 May : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज (ता. १४ मे) हडपसर ते फलटण पालखी मार्गाची पाहणी केली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी केवळ तीन गाड्या दिमतीला हेात्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनुसार गडकरी यांनी आपल्या वाहनांचा ताफा बाजूला ठेवून बसने प्रवास करत पालखी मार्गाची पाहणी केली. फलटणमध्ये दुपारचे भोजन करून ते पुढेही पंढरपूरपर्यंतही बसने प्रवास करूनही पालखी मार्गाची पाहणी करणार आहे.

नितीन गडकरी यांच्यासमेवत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे नीरा (ता. बारामती), माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, फलटणचे आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फलटणमध्ये सहभागी झाले होते.

इराण-अमेरिका युद्धामुळे सध्या इंधन टंचाई, महागाई वाढली आहे, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचतीचे आवाहन केले आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाची पाहणी करताना सर्व ताफा बाजूला ठेवून बसने पालखी महामार्गाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार गडकरी यांनी बसने प्रवास केला.

Nitin Gadkari
Pawan Rajenimbalkar : पवन राजेनिंबाळकर हत्या प्रकरण : निकालादिवशीच दोन मुख्य आरोपी गैरहजर, कोर्टाने दिली पुढची तारीख

जेजुरीत आता उड्डाणपूल

गडकरी यांनी फलटणमध्ये बोलताना संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पालखी महामार्गाची सद्यस्थिती सांगितली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम ८० टक्के पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले,. याच पालखी मार्गावर जेजुरीत बायपास करण्याचे ठरले होते. मात्र, स्थानिकांच्या विरोधानंतर जेजुरीत आता उड्डापणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Nitin Gadkari
No vehicle day : सायकल-बसने या! शक्य असेल तर चालत या, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी केला कायमचा निर्णय

फलटणमधील रस्त्यासाठी ९७ कोटींची घोषणा

दरम्यान, फलटणमधील विविध विकास कामांसाठी ९७ कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा केली आहे. फलटणमध्ये भोजनानंतर पंढरपूरपर्यंत बसने प्रवास करून पालखी मार्गाची पाहणी करणार आहेत. त्यामुळे मोदींच्या घोषणाचे गडकरी यांनी तंतोतंत पालन केल्याची दिसून आले.

नितीन गडकरी यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील सहभागी झाले होते. तसेच फलटणमध्ये आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गडकरींचे स्वागत केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com