Shivaji Adhalrao Patil News: लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीपासूनच राज्यातील शिरूर मतदारसंघाची चर्चा जोरदार सुरू होती. अजित पवारांनी अमोल कोल्हेंना लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आव्हानामुळे शिरूर लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने विद्यमान खासदार अमोल कोल्हेंची (Amol Kolhe) उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. दुसरीकडे महायुतीत शिरूरची (Shirur) जागा अजित पवार गटाला देण्यात आली. त्यामुळे अजित पवारांनी शिरूचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलं. त्यासाठीच आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आज जाहीर पक्षप्रवेश करणार आहे.
आढळरावांचा पक्षप्रवेश आज संध्याकाळी होणार आहे. त्याआधीच त्यांचे फेसबुक पेज चर्चेत आलं आहे. कारण त्यांनी आपल्या फेसबुक पेजमध्ये बदल करत फेसबुकवर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह टाकलं आहे. "जनता हीच माझी ताकद, काम हीच माझी ओळख" असं त्यांच्या फेसबुकवर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळं पक्षप्रवेशापूर्वीच सोशल मीडियावर आढळरावांच्या (Shivaji Adhalrao Patil) या फोटोमुळे चर्चांणा उधाण आलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिरूर मतदारसंघातील मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात आज सायंकाळी (26 मार्च) उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांच्या उपस्थितीत आढळरावांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश होणार आहे. या कार्यक्रमाला त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यास कडाडून विरोध करणारे खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील (Dilip Mohite-Patil) हेदेखील हजर राहणार आहेत.
आढळराव यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गिरे यांच्यासह आंबेगाव तालुक्यातील शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी आणि कार्यकर्ते हेदेखील राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधणार आहेत. त्यामुळे आता शिंदेंच्या शिलेदाराची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात घरवापसी थोड्याच वेळात होणार आहे, तर सेनेतून पुन्हा राष्ट्रवादीत आलेल्या आढळरावांना शिरूरची जनता कितपत साथ देणार हे येणाऱ्या निवडणुकीत कळेल.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.