Ashok Pawar-Dada Patil Farate-Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Shirur NCP Politics : अशोक पवारांच्या गडाला अजितदादांकडून सुरुंग; कट्टर विरोधकाला दिला राष्ट्रवादीत प्रवेश

Dada Patil Farate Entry NCP : शिरूरच्या आमदाराने मधल्या काळात धरसोड भूमिका घेतली, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अशोक पवार यांच्यावर केला.

Vijaykumar Dudhale

Pune News : शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार ॲड. अशोक पवार यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात अजितदादांनी इंदापूरच्या मेळाव्यात केली आहे. अशोक पवार यांचे कट्टर विरोधक, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देत त्यांना बळ देण्याचे काम केले आहे. याशिवाय आमदार पवार यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम अजित पवार गटाकडून करण्यात आले आहे. (NCP Indapur Melava)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इंदापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होत आहे. या मेळाव्यात रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक तथा माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, भाजप नेते राजेंद्र कोरेकर, वडगाव रासाई-मांडवगण फराटा गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी फराटे, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक आत्माराम फराटे, पंचायत समिती सदस्य (मांडवगण फराटा गण) राजेंद्र गदादे, लक्ष्मण बापू फराटे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Ajit Pawar News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार अशोक पवार यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी आणि अजित पवार गटाचे शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांच्या माध्यमातून हे पक्ष प्रवेश झाले आहेत. त्यामुळे विश्वासू सहकाऱ्यांकडूनच अशोक पवारांच्या गडाला सुरुंग लावण्याचे काम केले आहे. वडगाव रासाई आणि मांडवगण फराटा हा आमदार अशोक पवार यांचा गड मानला जातो. त्या गडातील महत्वपूर्ण मोहोर फोडण्यात अजित पवार यांना यश आले आहे.

शिरूरच्या आमदाराने मधल्या काळात धरसोड भूमिका घेतली, असा हल्ला करत अजित पवार यांनी दादा पाटील फराटे, राजेंद्र कोरेकर यांचे पक्षात स्वागत केले. ते म्हणाले, दादा पाटील फराटे हे १९९१ पासून माझ्यासोबत होते. यातील बहुतांशी लोकं माझ्यासोबत होते. इंदापूर तालुक्यात मेळावा होणार आहे, त्या ठिकाणी या, असा आम्ही त्यांना निरोप दिला हेाता. त्यानुसार दादा पाटील फराटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत आहे.

या नेत्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची शिरूरमध्ये ताकद वाढली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार जिंकण्यासाठी त्यांचे पाठबळ मिळेल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आमदार अशोक पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तो निर्णय अजित पवार यांना आवडलेला दिसत नाही. त्यातून अशोक पवार यांची आगामी काळात कोंडी करण्याचा प्रयत्न अजितदादा गटाकडून होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT