Sharad Pawar News : Chhatrapati Shivaji Maharaj  Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : शिवछत्रपतींनी भोसल्यांचं राज्य केलं नाही तर हिंदवी स्वराज्य.. ; शरद पवारांची भावना !

Sharad Pawar News : राज्य चालवायचं ते रयते साठी हा आदर्श शिवछत्रपतींनी संपूर्ण देशाला घालून दिला.

सरकारनामा ब्यूरो

Pune News : संभाजी ब्रिगेड संघटनेतर्फे (Sambhaji Brigade) आज पुण्यातील लालमहाल या वास्तूमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाचं महत्त्व सांगून शिवछत्रपतींचं राज्य हे सामान्य माणसाच्या हितांचं राज्य होते, अशी भावना व्यक्त केली. (Latest Marathi News)

याप्रसंगी शरद पवार म्हणाले, "शिवछत्रपतींनी राज्य उभं केलं. राज्यकारभार स्वीकारण्याचा आजचा दिवस आहे. राज्य स्वीकारलं पण राज्य कुणासाठी करावं? राज्य सामान्य जनतेसाठी करायचं, सर्वसामान्यांसाठी सत्तेची शक्ती खर्च करायची, हे सूत्र शिवछत्रपतींनी आपल्यासमोर ठेवलं. एक आदर्श त्यांनी निर्माण केला."

"या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले. त्यांचा इतिहास ही आहे. आज साडेतीनशे वर्ष झाल्यानंतर सुद्धा देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेल्यानंतर एक साधा प्रश्न विचारला तर सर्वसामान्य माणसांच्या अंतकरणात शिवछत्रपती आहेत. आसामध्ये असो किंवा केरळमध्ये असो, एकच नाव निघतं, ते नाव शिवछत्रपतींचं. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी राज्य कधी स्वत:साठी चालवलं नाही," असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले, "देशात अनेक राजे झाले, आणि त्यांचं राज्य हे त्यांच्या घराण्याच्या नावाने चाललं. एकच अपवाद असे होते. ते म्हणजे शिवछत्रपतींचा अपवाद. शिवछत्रपतींनी कधीही भोसल्यांचं राज्य केलं नाही. त्यांनी राज्य केलं ते हिंदवी स्वराज्यचं. राज्य चालवायचं ते रयते साठी हा आदर्श शिवछत्रपतींनी संपूर्ण देशाला घालून दिला."

"शिवछत्रपतींनी राज्याभिषेक करण्यासबंधीचा सोहळा केला, हा एक ऐतिहासिक सोहळा होता. काही घटकांनी या घटनेला वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला. पण या देशातल्या सामान्य माणसांनी पहिल्यांदा आपला राजांचं स्वागत केलं. शिवछत्रपतींना राजा म्हणून अंतकरणापासून स्वीकारलं," असं पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT